Monday, November 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

कॉकरोच जनता पार्टीचा देशभर विस्तार; १० राज्यांत समन्वय समित्या स्थापन, महाराष्ट्राचीही जबाबदारी निश्चित

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 16, 2026
in राष्ट्रीय, राजकारण
0
अभिजीत दीपकेंची मुंबईत जेल भरो आंदोलन करण्याची घोषणा
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : सोशल मीडियावरून चर्चेत आलेल्या अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आता देशभर संघटनात्मक विस्ताराला सुरुवात केली आहे. पक्षाने संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने १० राज्यांमध्ये राज्य आणि प्रादेशिक समन्वय समित्या स्थापन केल्या आहेत. तसेच विविध विभागांसाठी झोनल प्रभारींच्या नियुक्त्याही जाहीर केल्या आहेत. या विस्तारात महाराष्ट्राचाही समावेश असून, राज्यात १५ सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.

कॉकरोच जनता पार्टीने शनिवारी संघटनात्मक विस्ताराची घोषणा केली. त्यानुसार क्षितिज पगार यांच्याकडे पश्चिम विभागाची, तर डॉ. विवेक सांगवान यांच्याकडे उत्तर विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय मुहम्मद जनैद आणि गीगराज जोरली यांची उत्तर विभागाच्या समन्वय समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१० राज्यांमध्ये समित्यांची स्थापना
सीजेपीने जम्मू-काश्मीर, राजस्थान, पश्चिम बंगाल, हरियाणा, झारखंड, ईशान्य भारत, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये समन्वय समित्या स्थापन केल्या आहेत.

या समित्यांमधील सदस्यसंख्या 
– उत्तर प्रदेश – १६ सदस्य
– महाराष्ट्र – १५ सदस्य
– झारखंड – १४ सदस्य
– ईशान्य भारत – १४ सदस्य
– बिहार – १३ सदस्य
– पश्चिम बंगाल – १२ सदस्य
– हरियाणा – ६ सदस्य
– उत्तराखंड – ६ सदस्य
– राजस्थान – ५ सदस्य
– जम्मू-काश्मीर – ४ सदस्य

पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या समित्या आपापल्या विभागात संघटनेच्या कार्यक्रमांचे नियोजन करणार आहेत. तसेच प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचून संघटना मजबूत करणे आणि पक्षाचा प्रभाव वाढवणे यावर भर दिला जाणार आहे.

सरन्यायाधीशांच्या टिप्पणीमधून पक्षाच्या नावाची सुरुवात
कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात मे महिन्यात झाली होती. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका टिप्पणीमध्ये ‘कॉकरोच’ हा शब्द चर्चेत आला होता. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी याच शब्दाचा वापर करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॉकरोच जनता पार्टीच्या नावाने खाते सुरू केले. या अनोख्या नावामुळे पक्षाची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली आणि त्यानंतर पक्षाने संघटनात्मक कामाला सुरुवात केली.

नीट पेपरफुटीविरोधात ३६ दिवस आंदोलन
कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपरफुटी आणि विविध परीक्षांमधील गैरव्यवहारांविरोधात नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे तब्बल ३६ दिवस आंदोलन केले होते. या आंदोलनातून पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्यासह तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.

यानंतर पक्षाने शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, निवडणूक आयोगाच्या कामकाजातील मुद्दे आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेबाबत (SIR) आवाज उठवला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही पक्षाकडून करण्यात आली होती. तसेच १ नोव्हेंबर रोजी आयोजित इंडिया आघाडीच्या रॅलीला सीजेपीने पाठिंबा दिला होता. आता १० राज्यांमध्ये समित्यांची स्थापना करून पक्षाने संघटनात्मक विस्ताराचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रीय पातळीवर सीजेपीची भूमिका कशी राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! धान्य पुन्हा सुरू करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला बंधनकारक; जाणून घ्या नवा नियम

Next Post

जळगावच्या शामनगरात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री तीन बंद घरे फोडली; चोरटे सीसीटीव्हीत कैद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावच्या शामनगरात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री तीन बंद घरे फोडली; चोरटे सीसीटीव्हीत कैद

जळगावच्या शामनगरात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री तीन बंद घरे फोडली; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
गुलाबराव पाटलांशी राजकीय तडजोड? भाजप कार्यकर्त्याचे गिरीश महाजनांना खुले पत्र, जळगावात खळबळ

गिरीश महाजन लय लफडेबाज माणूस”; मंत्री गुलाबराव पाटलांची फटकेबाजी, जिल्हा बँक निवडणुकीवरूनही टोला

November 16, 2026
भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

“अपघात की घातपात?”; अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांचे पुन्हा गंभीर आरोप

November 16, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये परीक्षा न देता थेट नोकरीची संधी, असा करा अर्ज

सरकारी बँकेत तब्बल 837 जागांची भरती ; पदवीधर तरुणांना नोकरीची मोठी संधी

November 16, 2026
भाजप उमेदवाराची माघार! जिल्हा बँक निवडणुकीत आमदार अनिल पाटलांच्या पत्नी जयश्री पाटील बिनविरोध

भाजप उमेदवाराची माघार! जिल्हा बँक निवडणुकीत आमदार अनिल पाटलांच्या पत्नी जयश्री पाटील बिनविरोध

November 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page