Friday, November 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

राहुल गांधींचा खळबळजनक दावा! पंतप्रधान मोदी माझा फोन टॅप करत आहेत, माझ्याकडे पुरावेही…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 13, 2026
in राजकारण, राष्ट्रीय
0
PM मोदींनी मनरेगाच्या 24 वर्षांच्या बजेटचा पैसा उद्योगपतींवर खर्च केला ; राहुल गांधी
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. आपला फोन टॅप केला जात असल्याचा खळबळजनक दावा राहुल गांधी यांनी केला असून, यासंदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी हा आरोप केला. त्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यानुसार, परकीय शक्तींच्या सांगण्यावरून कोण काम करत आहे, देशविरोधी कारवायांमध्ये कोण सहभागी आहे आणि हे प्रकार किती काळापासून सुरू आहेत, याबाबतची माहिती आपल्याकडे असल्याचे त्यांनी म्हटले. या संदर्भातील माहिती आपल्या फोनमध्ये असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र, फोन टॅपिंगच्या आरोपांना अद्याप स्वतंत्र अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. तसेच राहुल गांधी यांच्या आरोपांवर भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

दरम्यान, राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीरपणे समोरासमोर चर्चेचे आव्हान दिले. दोघांमध्ये थेट चर्चा झाली, तर मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. राहुल गांधी यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

‘लोकसभेत बोलू दिले जात नाही’

इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी’ या प्रश्नोत्तर सत्रात राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. भाजप संसदेत चर्चेसाठी तयार असल्याचे सांगत असताना आपण सार्वजनिक चर्चेचा आग्रह का धरत आहोत, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी लोकसभेत आपल्याला अनेक महत्त्वाच्या विषयांवर बोलण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप केला. अनेकदा आपला मायक्रोफोन बंद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

कृषी कायदे, मतचोरी, एसआयआर, चीनचा मुद्दा, जनरल नरवणे यांचे पुस्तक आणि एपस्टाईन प्रकरण अशा विषयांवर संसदेत बोलण्याची परवानगी मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला. भाजपला दीर्घ भाषणांऐवजी या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करायची नसल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

छाननीत बाद, अपीलात वैध! सुमित पाटलांच्या अर्जाने जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ

Next Post

डिसेंबरमध्ये RBI देणार जोरदार धक्का? सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार? नेमका काय निर्णय घेण्याची शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बॅंकेवर RBI ची कारवाई; खात्यातून पैसे काढण्यावर बंदी, तुमचे खाते तर नाही?

डिसेंबरमध्ये RBI देणार जोरदार धक्का? सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार? नेमका काय निर्णय घेण्याची शक्यता

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मंगला एक्स्प्रेसमधील चोरीचा पोलिसांनी लावला छडा; चौघे अटकेत, दोन लॅपटॉप जप्त

मंगला एक्स्प्रेसमधील चोरीचा पोलिसांनी लावला छडा; चौघे अटकेत, दोन लॅपटॉप जप्त

November 13, 2026
देशातील ८१ कोटी रेशनकार्डधारकांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

सरकारी नोकरी असूनही रेशनवर स्वस्त धान्य घेतलं; १.८२ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

November 13, 2026
सोनं आणि चांदी पुन्हा महागलं! लक्ष्मीपूजनदिनी १ तोळ्याचा भाव किती?

जळगावच्या सराफा बाजारात मोठी घसरण! सोनं २,५०० तर चांदी ४ हजारांनी स्वस्त

November 13, 2026
चार नवीन कामगार संहितांबाबत जळगावात १६ नोव्हेंबरला ‘श्रम संवाद’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

चार नवीन कामगार संहितांबाबत जळगावात १६ नोव्हेंबरला ‘श्रम संवाद’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

November 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page