Friday, November 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मंगला एक्स्प्रेसमधील चोरीचा पोलिसांनी लावला छडा; चौघे अटकेत, दोन लॅपटॉप जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 13, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
मंगला एक्स्प्रेसमधील चोरीचा पोलिसांनी लावला छडा; चौघे अटकेत, दोन लॅपटॉप जप्त
बातमी शेअर करा..!

भुसावळ । मंगला एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या हातातील लॅपटॉप बॅगा हिसकावून पसार होणाऱ्या टोळीचा भुसावळ रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत पोलिसांनी चौघांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे ८५ हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढत पोलिसांनी ही कारवाई केली.

८ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील अब्दुल अजीम शेख (२४) हे आपल्या मित्रासोबत मंगला एक्स्प्रेसने प्रवास करत होते. गाडी भुसावळ रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर येताच २० ते २५ वर्षे वयोगटातील चार ते पाच तरुण एस-६ डब्यात शिरले.

गाडी थांबताच टोळीतील दोघांनी प्रवाशांच्या हातातील दोन लॅपटॉप बॅगा जबरदस्तीने हिसकावल्या आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. चोरीला गेलेल्या बॅगांमध्ये ४५ हजार रुपये किमतीचा आसुस कंपनीचा आणि ४० हजार रुपये किमतीचा एचपी कंपनीचा लॅपटॉप होता. याशिवाय आधारकार्ड, पॅनकार्ड आणि ८ हजार रुपये रोख असा एकूण सुमारे ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला.

सीसीटीव्हीच्या आधारे तपासाची चक्रे फिरली

घटनेनंतर पीडित प्रवाशाने ऑनलाइन तक्रार दाखल केली. त्यानुसार १० नोव्हेंबर रोजी भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ (२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरपीएफ, जीआरपी, सीपीडीएस आणि सीआयबीच्या पथकांनी संयुक्तपणे तपास सुरू केला. पोलिसांनी भुसावळ शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संशयितांचा माग काढला.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून पापा नगर येथील सलमान अब्दुल गफूर (२४) आणि मुस्लिम कॉलनीतील समीर अली शेरू अली (२४) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या घराची झडती घेतल्यानंतर चोरीला गेलेले दोन्ही लॅपटॉप पोलिसांच्या हाती लागले.चौकशीत मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी पापा नगर येथील शेख दानिश शेख अकील (२०) आणि काझी प्लॉट येथील जाहिद फकीर तडवी (१९) या दोघांनाही ताब्यात घेतले. अशाप्रकारे मंगला एक्स्प्रेसमधील लॅपटॉप चोरीप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी आरोपींकडून दोन लॅपटॉप जप्त केले असून, या टोळीने अशाच प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास सध्या लोहमार्ग पोलिसांकडून सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सरकारी नोकरी असूनही रेशनवर स्वस्त धान्य घेतलं; १.८२ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मंगला एक्स्प्रेसमधील चोरीचा पोलिसांनी लावला छडा; चौघे अटकेत, दोन लॅपटॉप जप्त

मंगला एक्स्प्रेसमधील चोरीचा पोलिसांनी लावला छडा; चौघे अटकेत, दोन लॅपटॉप जप्त

November 13, 2026
देशातील ८१ कोटी रेशनकार्डधारकांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

सरकारी नोकरी असूनही रेशनवर स्वस्त धान्य घेतलं; १.८२ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

November 13, 2026
सोनं आणि चांदी पुन्हा महागलं! लक्ष्मीपूजनदिनी १ तोळ्याचा भाव किती?

जळगावच्या सराफा बाजारात मोठी घसरण! सोनं २,५०० तर चांदी ४ हजारांनी स्वस्त

November 13, 2026
चार नवीन कामगार संहितांबाबत जळगावात १६ नोव्हेंबरला ‘श्रम संवाद’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

चार नवीन कामगार संहितांबाबत जळगावात १६ नोव्हेंबरला ‘श्रम संवाद’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

November 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page