Tuesday, November 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुलाचा उमेदवारी अर्ज बाद होताच किशोर पाटील आक्रमक; म्हणाले, ‘हिशोब चुकता करणार’

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 10, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ; आमदार किशोर पाटलांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
बातमी शेअर करा..!

जळगाव : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मुलगा सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीरपणे बाद ठरवण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणामागे ‘अदृश्य शक्ती’चा हात असल्याचा दावा करत योग्य वेळ आल्यावर संबंधितांचे नाव जाहीर करून हिशोब चुकता करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी सहनिबंधकांपासून ते उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी (दि. ९) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार किशोर पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधकांच्या (डीडीआर) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुमित पाटील यांच्या उमेदवारी अर्जात कोणतीही तांत्रिक त्रुटी नव्हती. सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करूनच अर्ज दाखल करण्यात आला होता. असे असताना अर्ज कोणत्या कायदेशीर तरतुदीखाली बाद करण्यात आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. डीडीआर यांनी लेखापरीक्षकाला पत्र देण्याचा अधिकार कोणत्या नियमांतर्गत वापरला, याचेही उत्तर मिळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

या प्रकरणाची सुनावणी सध्या सहनिबंधकांकडे सुरू असून १७ नोव्हेंबरपर्यंत संयम बाळगणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या प्रकरणामागील अदृश्य शक्ती कोण आहे, हे योग्य वेळी उघड करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

१० मते मिळवून दाखवा, सुमितचा राजीनामा देतो!

विरोधकांना थेट आव्हान देताना किशोर पाटील म्हणाले की, प्रत्यक्ष निवडणुकीत पराभूत करणे शक्य नसल्यानेच उमेदवारी अर्ज बाद करण्याची खेळी करण्यात आली आहे. एकूण ७९ पैकी ७५ मतदार दिवाळी फराळाला उपस्थित होते. विरोधकांनी प्रत्यक्ष निवडणूक लढवून १० पेक्षा अधिक मते मिळवून दाखवावीत, असे आव्हान त्यांनी दिले. तसे झाल्यास सुमितचा तात्काळ राजीनामा मिळवून देईन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेला युतीत समान वाटा हवा!

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील महायुतीच्या समीकरणावरही आमदार पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. भाजप आणि शिवसेनेला समान जागा मिळाव्यात, तर उर्वरित जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात याव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली. चेअरमन पदाबाबत योग्य तोडगा काढावा, तसेच व्हाईस चेअरमन पद तिन्ही पक्षांना प्रत्येकी एक वर्षासाठी देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी युतीचे संकेत दिले असून १७ नोव्हेंबरनंतर जागावाटपाचे चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला सन्मानजनक वाटा मिळालाच पाहिजे, असा आग्रहही त्यांनी धरला.

एकूणच, सुमित पाटील यांच्या उमेदवारी अर्जावरून सुरू झालेला वाद आता न्यायालयीन लढाई आणि महायुतीच्या जागावाटपापर्यंत पोहोचला असून, जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव तालुक्यात खळबळ! शेतातील वादातून ४८ वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून

Next Post

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी भाजपची पडद्यामागून सूत्रे? अमित शाहांच्या भेटीने चर्चांना उधाण; सुनेत्रा पवारांच्या भूमिकेकडे लक्ष!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी भाजपची पडद्यामागून सूत्रे? अमित शाहांच्या भेटीने चर्चांना उधाण; सुनेत्रा पवारांच्या भूमिकेकडे लक्ष!

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी भाजपची पडद्यामागून सूत्रे? अमित शाहांच्या भेटीने चर्चांना उधाण; सुनेत्रा पवारांच्या भूमिकेकडे लक्ष!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बंदिवान खून प्रकरणात जळगावचा कारागृह रक्षक निलंबित

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये राडा! जेवणात भाजी मागितल्याने चौघांकडून बंदीवानाला बेदम मारहाण

November 10, 2026
भक्तिस्वर, नाट्यगीत अन् शास्त्रीय सुरांनी सजली रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’

भक्तिस्वर, नाट्यगीत अन् शास्त्रीय सुरांनी सजली रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’

November 10, 2026
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

ISRO मध्ये ४०० अप्रेंटिस पदांची भरती; पदवीधर, डिप्लोमा आणि ITI उमेदवारांना संधी

November 10, 2026
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी भाजपची पडद्यामागून सूत्रे? अमित शाहांच्या भेटीने चर्चांना उधाण; सुनेत्रा पवारांच्या भूमिकेकडे लक्ष!

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी भाजपची पडद्यामागून सूत्रे? अमित शाहांच्या भेटीने चर्चांना उधाण; सुनेत्रा पवारांच्या भूमिकेकडे लक्ष!

November 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page