भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये अप्रेंटिसशिप करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्र (SDSC SHAR) येथे विविध ट्रेडमधील एकूण ४०० अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
४०० पदांसाठी भरती
या भरतीमध्ये इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिसची ५०, नॉन-इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिसची ६०, टेक्निशियन अप्रेंटिसची ३५, डिप्लोमा अप्रेंटिसची ६०, ट्रेड अप्रेंटिसची १८० आणि व्होकेशनल अप्रेंटिसची १५ पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता काय?
इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट पदांसाठी संबंधित शाखेतील बीई किंवा बीटेक पदवीसह किमान ६० टक्के गुण आवश्यक आहेत. नॉन-इंजिनिअरिंग पदांसाठी बीएस्सी, बीकॉम किंवा बीए पदवीधारक अर्ज करू शकतात. डिप्लोमा पदांसाठी संबंधित विषयातील डिप्लोमा आणि किमान ६० टक्के गुण आवश्यक आहेत. ट्रेड अप्रेंटिससाठी संबंधित ट्रेडमधील आयटीआय, तर व्होकेशनल अप्रेंटिससाठी दोन वर्षांचे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
असा करा ऑनलाइन अर्ज
इच्छुक उमेदवारांनी NATS किंवा अधिकृत अप्रेंटिसशिप पोर्टलवर नोंदणी करावी. त्यानंतर आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करावीत. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून ठेवावी.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी NATS पोर्टल (nats.education.gov.in) किंवा अधिकृत अप्रेंटिसशिप पोर्टल (apprenticeship.gov.in) ला भेट द्यावी. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीत दिलेली पात्रता आणि अटी तपासाव्यात.















Discussion about this post