Wednesday, September 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home वाणिज्य

सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडर स्वस्त; तुमच्या शहरातले दर काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 1, 2026
in वाणिज्य
0
चिंताजनक ! कतारमधील सर्वात मोठ्या एलएनजी सेंटरवर हल्ला, भारतावर काय परिणाम होणार?
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्याचा पहिलाच दिवस एलपीजी ग्राहकांसाठी दिलासादायक ठरला आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत तब्बल १९२ रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी घरगुती ग्राहकांना दरकपातीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

इंडियन ऑईलने जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार, दिल्लीमध्ये १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर १९२ रुपयांनी स्वस्त होऊन २,७३८ रुपयांवर आला आहे. पटणामध्ये त्याची किंमत ३,२२७ रुपयांवरून ३,०१८ रुपये झाली आहे. तर लखनऊमध्ये हा सिलेंडर ३,०५२.५० रुपयांवरून २,८६०.५० रुपयांवर उपलब्ध होणार आहे. सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरिंग तसेच अन्य व्यावसायिक क्षेत्रांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

दुसरीकडे, उज्ज्वला योजनेतील काही लाभार्थ्यांसाठी मात्र ऑगस्ट महिन्यापासून एलपीजी महागणार आहे. १ एप्रिल ते ३१ जुलैदरम्यान चार अनुदानित सिलेंडरचे रिफिल पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना यापुढे ३०० रुपयांचे अनुदान मिळणार नाही. त्यामुळे अशा ग्राहकांना पुढील सिलेंडरसाठी सर्वसामान्य ग्राहकांप्रमाणे पूर्ण किंमत भरावी लागणार आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच चालू आर्थिक वर्षापासून अनुदानाची मर्यादा चार सिलेंडरपर्यंत निश्चित केली आहे.

दरम्यान, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती कायम ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरची किंमत ९४१.५० रुपये आहे. बेंगळुरूमध्ये ९४४.५० रुपये, अहमदाबाद आणि गुरुग्राममध्ये ९४९ रुपये, जयपूरमध्ये ९५२.५० रुपये, चेन्नईमध्ये ९५७.५० रुपये, कोलकात्यात ९६८ रुपये, लखनऊमध्ये ९७६.५० रुपये, तर हैदराबादमध्ये ९९४ रुपये इतका दर कायम आहे.

व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाल्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात कधी होणार, याकडे आता देशभरातील गृहिणी आणि सर्वसामान्य ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावच्या तांबापुरा परिसरातील दोन दुकानांना भीषण आग

Next Post

जळगावात एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक अटकेत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगावात एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक अटकेत

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
निवडणूक आयोगातच मतभेद? दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

निवडणूक आयोगातच मतभेद? दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

September 23, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

खान्देशात काँग्रेसला धक्का ; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

September 23, 2026
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

“लोकशाही वाचवायची असेल तर…निवडणूक आयोगावरून उद्धव ठाकरेंची दंड थोपटले; वाचा काय म्हणाले

September 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page