नंदुरबार । नंदुरबारच्या नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का देत स्थानिक नेते आकाश गावित यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे आमदार राजेश पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी गावित यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

आकाश गावित हे नवापूरचे काँग्रेस आमदार शिरीष नाईक यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गावित यांच्या प्रवेशामुळे नवापूरमध्ये काँग्रेस आणि भाजपमधील स्थानिक राजकीय समीकरणांबाबत नव्याने चर्चा रंगली आहे.

पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे आमदार राजेश पाडवी यांच्यासह जिल्हाध्यक्ष निलेश माळी आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गावित आणि त्यांच्या समर्थकांचे भाजपकडून स्वागत करण्यात आले.
आकाश गावित हे माजी खासदार कै. माणिकराव गावित यांचे नातू असल्याचे सांगितले जाते. नवापूर विधानसभा मतदारसंघात गावित कुटुंबाची दीर्घकाळ राजकीय उपस्थिती राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाकडे स्थानिक राजकारणातील महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिले जात आहे.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्षसंघटन मजबूत करण्याच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाचा नवापूरमधील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले















Discussion about this post