Monday, November 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पंढरपुरात विहीर दुर्घटनेत तिघांचा मृत्यू; चौथ्या मजुराचा शोध सुरू, बचावकार्य सुरूच

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 16, 2026
in महाराष्ट्र
0
पंढरपुरात विहीर दुर्घटनेत तिघांचा मृत्यू; चौथ्या मजुराचा शोध सुरू, बचावकार्य सुरूच
बातमी शेअर करा..!

पंढरपूर : तालुक्यातील आंबे येथे विहिरीचा कठडा कोसळून चार मजूर गाडले गेल्याच्या दुर्घटनेने खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेनंतर सुमारे २० तासांपासून बचावकार्य सुरू असून, रात्री दोन वाजेपर्यंत तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मंगेश मोरे आणि सिद्धेश्वर घाडगे यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला असून, चौथ्या मजुराचा शोध अद्याप सुरू आहे.

आंबे येथील एका विहिरीचे काम सुरू असताना काल सकाळी सुमारे दहा वाजता अचानक विहिरीचा कठडा कोसळला. त्यावेळी काम करणारे चार मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. दिवसभर बचावकार्य सुरू होते. त्यानंतर सायंकाळी एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शोधकार्याला वेग आला.

रात्री दोन वाजेपर्यंत बचाव पथकाला तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मात्र, अजून एक मजूर विहिरीत अडकलेला असून त्याचा शोध घेण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रात्री घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन हे देखील कालपासून घटनास्थळी ठाण मांडून असून, बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत.

या दुर्घटनेबाबत बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, विहिरीच्या कामासाठी नेमकी कोणती पद्धत वापरण्यात आली, आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या का, ब्लास्टिंग करण्यात आले होते का आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, याची सखोल चौकशी केली जाईल.

या दुर्घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृत मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.

दरम्यान, चौथ्या मजुराचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. उर्वरित शोधकार्य पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी विहीर खोदाईचे काम सुरू करण्यापूर्वी शासनाच्या सर्व आवश्यक परवानग्या घेऊनच काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

गिरीश महाजनांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा? विरोधकांचे अपीलही फेटाळले!

Next Post

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती; ९ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात काय स्थिती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
‘अर्णब’ चक्रीवादळाचा कहर! ९० हून अधिक रेल्वे गाड्या रद्द; महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती; ९ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात काय स्थिती?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
गुलाबराव पाटलांशी राजकीय तडजोड? भाजप कार्यकर्त्याचे गिरीश महाजनांना खुले पत्र, जळगावात खळबळ

गिरीश महाजन लय लफडेबाज माणूस”; मंत्री गुलाबराव पाटलांची फटकेबाजी, जिल्हा बँक निवडणुकीवरूनही टोला

November 16, 2026
भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

“अपघात की घातपात?”; अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांचे पुन्हा गंभीर आरोप

November 16, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये परीक्षा न देता थेट नोकरीची संधी, असा करा अर्ज

सरकारी बँकेत तब्बल 837 जागांची भरती ; पदवीधर तरुणांना नोकरीची मोठी संधी

November 16, 2026
भाजप उमेदवाराची माघार! जिल्हा बँक निवडणुकीत आमदार अनिल पाटलांच्या पत्नी जयश्री पाटील बिनविरोध

भाजप उमेदवाराची माघार! जिल्हा बँक निवडणुकीत आमदार अनिल पाटलांच्या पत्नी जयश्री पाटील बिनविरोध

November 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page