Sunday, August 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

स्मार्ट मीटरचा ऑटो डिस्कनेक्ट झाल्यानंतरही वीजचोरी; जळगावात तीन ग्राहकांवर गुन्हे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 8, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
स्मार्ट मीटरचा ऑटो डिस्कनेक्ट झाल्यानंतरही वीजचोरी; जळगावात तीन ग्राहकांवर गुन्हे
बातमी शेअर करा..!

जळगाव : थकबाकीमुळे स्मार्ट मीटरद्वारे वीजपुरवठा आपोआप खंडित झाल्यानंतरही अनधिकृतपणे वीजजोडणी करून वीज वापरणाऱ्या तीन ग्राहकांविरुद्ध महावितरणने कारवाई केली आहे. महावितरणच्या तपासणीत वीजचोरी उघडकीस आल्यानंतर संबंधितांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

श्रीराम चौक परिसरातील प्रतिभा रितेश पवार यांच्या वीजजोडणीचा थकबाकीमुळे स्मार्ट मीटरद्वारे ऑटो डिस्कनेक्ट करण्यात आला होता. मात्र, वीजपुरवठा खंडित असतानाही घरासमोरील लघुदाब वीजवाहिनीवर आकडा टाकून वीज वापरल्याचे महावितरणच्या पथकाला आढळले. या प्रकरणात सुमारे ९ हजार ७०० रुपयांची वीजचोरी झाल्याचे समोर आले.

आशाबाबा कॉलनीतील लक्ष्मी भानुदास बागडे यांच्या वीजजोडणीवरही थकबाकी असल्याने स्मार्ट मीटरद्वारे वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी वीजवाहिनीवर अनधिकृत जोडणी करून वीज वापरल्याचे तपासणीत आढळले. या प्रकरणात ३४ हजार रुपयांची वीजचोरी झाल्याचे महावितरणने नमूद केले आहे.

तर शिव कॉलनीतील स्वप्नील प्रशांत सैंदाणे याच्याकडूनही थकबाकीमुळे वीजपुरवठा बंद असताना अनधिकृतपणे वीज वापरल्याचे आढळून आले. त्याच्याकडून ३८ हजार ८५० रुपयांची वीजचोरी झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. या तिन्ही प्रकरणांत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दिलीप मराठे यांच्या फिर्यादीवरून ७ ऑगस्ट रोजी भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांनी थकीत बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अनधिकृतपणे वीजजोडणी करून वीज वापरणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी महावितरणने विशेष पथके नियुक्त केली आहेत.

वीजपुरवठा स्वतःहून जोडल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा महावितरणने दिला आहे. अनधिकृत जोडणीमुळे विजेचा धक्का लागून गंभीर किंवा प्राणघातक दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी अशा पद्धतीने वीजजोडणी करू नये. तसेच शेजाऱ्यांना अनधिकृतपणे वीजपुरवठा उपलब्ध करून देऊ नये, अन्यथा संबंधितांवरही कारवाई केली जाईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या भावावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Next Post

‘भिऊ नका’चा संदेश नेमका कुणाला? मोदींच्या फुटीर खासदारांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंचा घणाघात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

‘भिऊ नका’चा संदेश नेमका कुणाला? मोदींच्या फुटीर खासदारांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंचा घणाघात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये लिपिक पदाच्या १,५३८ जागांसाठी भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

August 9, 2026
वाहनधारकांनो लक्ष द्या ! फर्दापुर ते जळगाव चौपदरीकरणाचे काम सुरु, असा असेल पर्यायी रस्ता

जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार

August 9, 2026
दीड महिन्यांत साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ ; आता एक किलोचा दर किती?

सणासुदीपूर्वी साखरेचा भाव वाढला; सरकारने घेतला हा मोठा निर्णय

August 8, 2026
सातपुड्यातील प्रसिद्ध मनूदेवी मंदिरात धाडसी चोरी; १.३५ लाखांचे चांदीचे मुकुट-छत्र्या लंपास

सातपुड्यातील प्रसिद्ध मनूदेवी मंदिरात धाडसी चोरी; १.३५ लाखांचे चांदीचे मुकुट-छत्र्या लंपास

August 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page