सेवा संकल्प अभियानांतर्गत करिअर मार्गदर्शन

जळगाव | सेवा संकल्प अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून जिल्हा समाज कल्याण सहायक आयुक्त आणि मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात धुळे येथील जिल्हा जात पडताळणी कार्यालयाचे नवनियुक्त संशोधन अधिकारी प्रमोद राणेराजपूत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक अजय ठाकूर, गृहपाल निखिल महाजन, सतीश सोनवणे यांच्यासह समाजकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना प्रमोद राणेराजपूत यांनी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, अभ्यासातील सातत्य, वेळेचे नियोजन, अभ्यासाचे योग्य नियोजन तसेच उपलब्ध शैक्षणिक व व्यावसायिक संधींचा प्रभावी उपयोग याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. योग्य नियोजन, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविता येते, असे त्यांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमुळे तसेच करिअरच्या विविध संधींची माहिती मिळाली. त्याचबरोबर अभ्यासाबाबतची प्रेरणा आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत झाल्याचे उपस्थितांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतिगृहातील विद्यार्थिनी रोशनी चव्हाण हिने केले तर महेंद्र पाटील यांनी आभार मानले.














Discussion about this post