नवी दिल्ली । नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि इतर सर्व प्रमुख मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्यानंतर, ‘कॉकरोच जनता पार्टीने’ (CJP) राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले आपले आंदोलन अधिकृतपणे मागे घेण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारला असून शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
या ऐतिहासिक यशानंतर CJP आता ही पार्टी पुढे नक्की काय करणार, असा सवाल उपस्थित केला जात होता. यावर सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी पक्षाचा पुढील प्लॅन जाहीर केला. आता आम्ही संपूर्ण देशात जाऊन जनतेशी संबंधित इतर महत्त्वाचे मुद्दे देखील उपस्थित करणार आहोत, असे स्पष्ट केले आहे.
न्यायाचा आणि तरुणांचा ऐतिहासिक विजय: आशुतोष रांका
आंदोलन मागे घेताना पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “देशातील तरुण आता स्वतःच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी पूर्णपणे जागरूक झाला आहे. लाखो-करोडो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या या दुर्दैवी प्रकाराविरोधात अखेर न्यायाचा विजय झाला आहे. या लढ्यात ज्या पालकांनी आणि कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्या वेदनांमध्ये आम्ही सहभागी आहोत.”
नवीन शिक्षणमंत्र्यांवर भाष्य करताना ते म्हणाले, “देशाची धुरा सांभाळणाऱ्या नवीन शिक्षणमंत्र्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि उत्तरदायित्वाने आपले काम करावे, हीच आमची अपेक्षा आहे.”















Discussion about this post