Tuesday, September 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

MPSCचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पुन्हा येणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं ; म्हणाले…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 22, 2026
in महाराष्ट्र
0
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..
बातमी शेअर करा..!

मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्य शासनाकडून अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय (हायपॉवर) समिती नेमण्यात आली आहे. ही समिती विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि मागण्यांवर सविस्तर सुनावणी घेत असून, समितीने एमपीएससी परीक्षेसाठी जुनाच ‘ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न’ सूचवल्यास सरकार तो नक्की स्वीकारेल, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मिडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती अत्यंत गांभीर्याने काम करत असून, सलग ६ ते ८ तास बसून थेट विद्यार्थ्यांचे व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत आहे. या सुनावणीदरम्यान विद्यार्थ्यांकडून विविध सेवा परीक्षांसाठी पुन्हा जुना ‘ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न’ (वस्तुनिष्ठ पद्धत) लागू करण्याची मागणी जोरकसपणे लावून धरली जात आहे.

यापूर्वी दळवी समितीच्या शिफारशीनुसार ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नवरून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नकडे (वर्णनात्मक पद्धत) जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता विद्यार्थ्यांच्या वाढत्या मागण्या पाहता, समितीने अहवालात ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नबाबत शिफारस केल्यास सरकार त्याबाबत कोणतीही नकारात्मक भूमिका घेणार नाही, असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्याना मोठा दिलासा दिला आहे.

विक्रमी पदांची भरती होणार

एमपीएससी आणि ग्रुप ‘सी’ मधील रिक्त पदांच्या संख्येसंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आगामी परीक्षांमध्ये आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडून विक्रमी पदांची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे एमपीएससीच्या माध्यमातून कितीतरी पट जास्त पदे भरली जातील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठीदेखील स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या मुद्द्यावरून अध्यक्षांचा राजीनामा मागितला जात आहे, तो प्रकार त्यांच्या नियुक्तीपूर्वीचा आहे. तसेच, एमपीएससीच्या अध्यक्षांची नियुक्ती आणि त्यांना पदावर ठेवण्याबाबतचा अधिकार महामहिम राज्यपालांचा आहे, सरकारचा नाही.असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा! पुढील ४ दिवस कुठे-कुठे यलो अलर्ट?

Next Post

भुसावळ एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग; अडीच ते तीन कोटींचे नुकसान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भुसावळ एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग; अडीच ते तीन कोटींचे नुकसान

भुसावळ एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग; अडीच ते तीन कोटींचे नुकसान

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भुसावळ एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग; अडीच ते तीन कोटींचे नुकसान

भुसावळ एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग; अडीच ते तीन कोटींचे नुकसान

September 22, 2026
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

MPSCचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पुन्हा येणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं ; म्हणाले…

September 22, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा! पुढील ४ दिवस कुठे-कुठे यलो अलर्ट?

September 22, 2026
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत ११० जागांसाठी भरती; त्वरित करा अर्ज

September 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page