Sunday, July 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ठाकरे बंधूंच्या ‘तिरंगा मोर्चा’ला जनसमुद्राचा प्रतिसाद; आता ‘इथेनॉल मिश्रित पेट्रोल’विरोधात एल्गार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 26, 2026
in महाराष्ट्र
0
ठाकरे बंधूंच्या ‘तिरंगा मोर्चा’ला जनसमुद्राचा प्रतिसाद; आता ‘इथेनॉल मिश्रित पेट्रोल’विरोधात एल्गार
बातमी शेअर करा..!

उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल

मुंबई । नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर, आज राजधानी मुंबईत मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संयुक्तपणे भव्य ‘तिरंगा मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. दादरच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) ते श्री सिद्धिविनायक मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चाला तरुणांपासून ते अबालवृद्धांपर्यंत नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

या ऐतिहासिक मार्चमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता.

“गडकरी हे ‘खड्डामंत्री'”: उद्धव ठाकरेंचा टोला

मोर्च्यानंतर आयोजित सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांवर चौफेर हल्लाबोल केला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा उल्लेख त्यांनी थेट “खड्डामंत्री” असा करताच सभेत एकच हशा पिकला.

केंद्रातील इतर मंत्र्यांवर टीका करताना ते म्हणाले, “केंद्रीय अर्थमंत्री देशातील वाढत्या महागाईवर अवाक्षरही बोलत नाहीत, पण पेपरफुटीचे फायदे सांगण्यात त्या व्यस्त आहेत. देशाच्या संरक्षणाची पुरती बोंब झालेली असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे धर्मेंद्र प्रधानांच्या संरक्षणासाठी पुढे धावून आले होते. तर आपले ‘खड्डामंत्री’ आणि रस्तामंत्री हे सध्या इथेनॉलवर बोलत आहेत.”

पंतप्रधान मोदींना इशारा देताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “मोदीजी, तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून हटवताना तुम्हाला जितक्या यातना झाल्या असतील, त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक वेदना नीट पेपरफुटीमुळे ज्या निष्पाप विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या पालकांना झाल्या आहेत.”

आता पुढचा लढा ‘इथेनॉल मिश्रित पेट्रोल’विरोधात!

नीट प्रकरणातील यशानंतर आता विरोधकांनी आपला मोर्चा E20 (इथेनॉल मिश्रित) पेट्रोलच्या मुद्द्याकडे वळवला आहे. सभेतून स्पष्ट संकेत देत उद्धव ठाकरे यांनी यापुढील आंदोलन इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या सक्तीविरोधात असेल, अशी घोषणा केली. E20 पेट्रोलमुळे गाड्यांचे मायलेज घटले असून वाहनांचा देखभाल खर्च प्रचंड वाढला आहे, तसेच इंजिनच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

४ ऑगस्ट रोजी संसदेवर धडकणार मोर्चा

दरम्यान, दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशनने देखील E20 पेट्रोलच्या अघोषित सक्तीविरोधात येत्या ४ ऑगस्ट रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष संजय सम्राट यांनी वाहनधारकांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत उद्धव ठाकरे यांनी हाच मुद्दा आता विरोधकांच्या अजेंड्यावर अग्रक्रमावर असल्याचे स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ऐतिहासिक यशानंतर CJP आता पुढे काय करणार? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
ठाकरे बंधूंच्या ‘तिरंगा मोर्चा’ला जनसमुद्राचा प्रतिसाद; आता ‘इथेनॉल मिश्रित पेट्रोल’विरोधात एल्गार

ठाकरे बंधूंच्या ‘तिरंगा मोर्चा’ला जनसमुद्राचा प्रतिसाद; आता ‘इथेनॉल मिश्रित पेट्रोल’विरोधात एल्गार

July 26, 2026
ऐतिहासिक यशानंतर CJP आता पुढे काय करणार? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन

ऐतिहासिक यशानंतर CJP आता पुढे काय करणार? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन

July 26, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंचा जल्लोष; उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट हल्लाबोल

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंचा जल्लोष; उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट हल्लाबोल

July 26, 2026
जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान अभिजीत दीपकेंची प्रकृती खालावली; ‘मला माफ करा’, म्हणत आंदोलनस्थळ सोडले

दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे; ‘सीजेपी’ने केली अधिकृत घोषणा!

July 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page