Wednesday, October 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

गावाकडे परतत होता, पण वाटेतच काळाचा घाला; पाचोऱ्यातील तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 6, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
गावाकडे परतत होता, पण वाटेतच काळाचा घाला; पाचोऱ्यातील तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू
बातमी शेअर करा..!

पाचोरा । परधाडे ते पाचोरा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या रेल्वेतून पाय घसरून खाली पडल्याने एका ३६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संजय अनिल पाटील (वय ३६, रा. दुसखेडा, ता. पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव असून, या अपघातानंतर परिसरामध्ये व त्याच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत संजय पाटील हे अहमदाबाद येथील एका खाजगी कंपनीत वेल्डिंगचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी परराज्यात मेहनतमजुरी करणारे संजय ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी अहमदाबादहून आपल्या गावी येण्यासाठी निघाले होते.

पहाटे ते जळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचले. तेथून पाचोऱ्याला जाण्यासाठी त्यांनी पुन्हा रेल्वेने प्रवास सुरू केला. मात्र, परधाडे ते पाचोरा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे पोल क्रमांक ३८१/२६ जवळ अचानक त्यांचा पाय घसरला आणि तोल गेल्याने ते धावत्या रेल्वेतून खाली रानावनात किंवा ट्रॅकवर कोसळले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाटील यांनी ‘जय महाकाल’ रुग्णवाहिकेचे चालक किशोर लोहार यांच्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे पंचनामा केल्यानंतर चालक किशोर लोहार व मयूर सोनार यांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.

या अचानक घडलेल्या आघातामुळे मृत संजय यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी व एक भाऊ असा भरतांडा परिवार पोरका झाला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस नाईक हरीश गवळी करीत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बँकेतून पाठलाग, गॅरेजमध्ये डाव अन् ७७ हजारांची चोरी; ‘ऑपरेशन MP’मध्ये आरोपी जेरबंद

Next Post

काँग्रेसचा एल्गार; निवडणूक आयोगाविरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
काँग्रेसचा एल्गार; निवडणूक आयोगाविरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा

काँग्रेसचा एल्गार; निवडणूक आयोगाविरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ

कूपनलिकेच्या नोंदीसाठी शेतकऱ्याकडून लाच घेताना आमोद्याचा तलाठी रंगेहात जाळ्यात!

October 6, 2026
मावस बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध नडला; जळगावात २८ वर्षीय तरुणाने संपविले जीवन

मावस बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध नडला; जळगावात २८ वर्षीय तरुणाने संपविले जीवन

October 6, 2026
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत

October 6, 2026
जळगाव गोळीबार प्रकरणात आठ जणांना घेतलं ताब्यात

तरुण शेतकऱ्याने गावठी कट्ट्यातून स्वतःवर झाडली गोळी; चिनावलमध्ये खळबळ

October 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page