Monday, October 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बँकेतून पाठलाग, गॅरेजमध्ये डाव अन् ७७ हजारांची चोरी; ‘ऑपरेशन MP’मध्ये आरोपी जेरबंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 5, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
बँकेतून पाठलाग, गॅरेजमध्ये डाव अन् ७७ हजारांची चोरी; ‘ऑपरेशन MP’मध्ये आरोपी जेरबंद
बातमी शेअर करा..!

जळगाव : बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या ग्राहकावर पाळत ठेवत त्याचा पाठलाग करून संधी साधत ७७ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पाचोरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील सांसी कडिया परिसरात धडक देत रितीक राजाराम सिसोदिया या संशयिताला अटक केली. त्याच्याकडून चोरीची संपूर्ण ७७ हजार ५०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

ही घटना १९ ऑगस्ट रोजी घडली. बनोटी (ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील दिनेश निलेश सोनवणे हे पाचोरा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पैसे भरण्यासाठी आले होते. मात्र, बँकेत मोठी गर्दी असल्याने ते कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील एका ऑटो गॅरेजमध्ये दुचाकी दुरुस्तीसाठी गेले.

याचदरम्यान आरोपीने सोनवणे यांच्यावर बँकेपासूनच पाळत ठेवली होती. गॅरेजमध्ये ते कामात व्यस्त असल्याची संधी साधत आरोपीने ७७ हजार ५०० रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केली आणि पसार झाला. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात BNS कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि डीवायएसपी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी तपासाला गती दिली.गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल हरीश परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बँक तसेच परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये संशयित आरोपी बँकेपासून गॅरेजपर्यंत फिर्यादीचा पाठलाग करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

यानंतर तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यामागे मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळीचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मध्यप्रदेशात पाचोरा पोलिसांची धडक

मिळालेल्या माहितीच्या आधारे पाचोरा पोलिसांचे विशेष पथक १ ऑक्टोबर रोजी मध्यप्रदेशात रवाना झाले. बोड़ा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सांसी कडिया परिसरात स्थानिक पोलिसांच्या मदतीने ३ ऑक्टोबर रोजी कारवाई करण्यात आली.या कारवाईत रितीक राजाराम सिसोदिया याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत त्याचा या चोरीच्या गुन्ह्यात सहभाग समोर आला. त्याच्याकडून चोरीला गेलेली ७७ हजार ५०० रुपयांची संपूर्ण रोकड हस्तगत करण्यात आली.

या कारवाईमुळे बँक परिसरात ग्राहकांवर पाळत ठेवून संधी साधत चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीविरोधात पाचोरा पोलिसांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बँकेतून पाठलाग, गॅरेजमध्ये डाव अन् ७७ हजारांची चोरी; ‘ऑपरेशन MP’मध्ये आरोपी जेरबंद

बँकेतून पाठलाग, गॅरेजमध्ये डाव अन् ७७ हजारांची चोरी; ‘ऑपरेशन MP’मध्ये आरोपी जेरबंद

October 5, 2026
दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा

दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा

October 5, 2026
पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा पाय घसरला; बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा पाय घसरला; बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
राज्यात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची माहिती

राज्यात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची माहिती

October 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page