Thursday, October 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धक्कादायक ! व्यापाऱ्याच्या फसवणुकीतून जळगावात तरुण उद्योजकाची आत्महत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 11, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
धक्कादायक ! व्यापाऱ्याच्या फसवणुकीतून जळगावात तरुण उद्योजकाची आत्महत्या
बातमी शेअर करा..!

जळगाव : राजस्थानातील एका फर्मला पाठवलेल्या मालाचे सुमारे ७ लाख रुपये थकीत राहिल्याने आर्थिक आणि मानसिक तणावातून जळगावातील एका तरुण उद्योजकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एमआयडीसी परिसरातील म्हाळसाई इरिगेशन कंपनीत योगेश एकनाथ नेमाडे (३५, रा. ईश्वर कॉलनी, जळगाव) यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. सोमवारी (१० ऑगस्ट) ही घटना घडली.

योगेश नेमाडे हे व्यवसायानिमित्त राजस्थानमधील एका फर्मला माल पुरवत होते. संबंधित फर्मकडून मालाचे पैसे मिळणे अपेक्षित होते. मात्र, सुमारे ७ लाख रुपयांची थकबाकी दीर्घकाळ मिळाली नसल्याने ते आर्थिक अडचणीत आले होते. याच कारणातून ते मानसिक तणावात असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

सुसाईड नोटमुळे प्रकरणाला वेगळे वळण

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आली. या चिठ्ठीत योगेश यांनी आपल्या मृत्यूमागील कारणाबाबत माहिती दिल्याचे समोर आले आहे.

राजस्थानमधील धार जिल्ह्यातील राजोद येथील एका फर्मकडून आपली मोठी रक्कम येणे बाकी असल्याचा उल्लेख त्यांनी सुसाईड नोटमध्ये केल्याचे सांगण्यात येत आहे. पैसे मिळविण्यासाठी संबंधितांकडे वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आपण त्रस्त झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

याशिवाय संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करताना कॉल लिस्ट तपासण्याचा उल्लेखही त्यांनी केल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात आर्थिक व्यवहार नेमका कसा झाला आणि थकीत रक्कम कोणाकडे होती, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.सुसाईड नोटमध्ये योगेश यांनी पत्नी आणि मुलीचा उल्लेख करत कुटुंबीयांची माफी मागितल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.

योगेश हे भावासोबत व्यवसाय करत होते. एमआयडीसी परिसरात त्यांचा व्यवसाय सुरू होता. सोमवारी कंपनीच्या आवारात त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून त्यातील मजकूर आणि संबंधित आर्थिक व्यवहाराची पडताळणी सुरू केली आहे.

राजस्थानमधील संबंधित फर्मसोबत झालेला व्यवहार, थकीत रक्कम आणि सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या व्यक्तींची भूमिका याबाबत तपास केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. या घटनेमुळे जळगावातील व्यापारी आणि उद्योजक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘हरित जळगाव’ अभियानाला सुरुवात; ३ हजार रोपांनी सजणार टीएम नगर

Next Post

महाराष्ट्रात आजपासून दूध महागले! गायी, म्हशीच्या दुधासाठी आता मोजावे लागणार इतके रुपये

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दूध उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी

महाराष्ट्रात आजपासून दूध महागले! गायी, म्हशीच्या दुधासाठी आता मोजावे लागणार इतके रुपये

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्य महत्वाचे : प्रमोद राणेराजपूत

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्य महत्वाचे : प्रमोद राणेराजपूत

October 8, 2026
‘२०१८ची शिवसेना पक्षाची घटना असंवैधानिक असेल तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?’; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात सवाल

ठाकरेंच्या अडचणी वाढणार? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाने पुन्हा उपस्थित केला ‘पक्षघटने’चा मुद्दा

October 8, 2026
अपघाताने फुटले गुटखा तस्करांचे बिंग! अपघातग्रस्त कारमधून लाखोंचा गुटखा जप्त

अपघाताने फुटले गुटखा तस्करांचे बिंग! अपघातग्रस्त कारमधून लाखोंचा गुटखा जप्त

October 8, 2026
खरगेंची ‘लंच डिप्लोमसी’; राहुल-प्रियंकांसह विरोधी खासदार राजघाटकडे रवाना

खरगेंची ‘लंच डिप्लोमसी’; राहुल-प्रियंकांसह विरोधी खासदार राजघाटकडे रवाना

October 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page