Monday, September 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

दिवाळीच्या खरेदीआधी महागाईचा झटका! टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनसह AC महागणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 28, 2026
in राष्ट्रीय
0
दिवाळीच्या खरेदीआधी महागाईचा झटका! टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनसह AC महागणार?
बातमी शेअर करा..!

दसरा आणि दिवाळीच्या खरेदीची तयारी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सणासुदीच्या काळात टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आणि एसी यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी आता अधिक पैसे मोजावे लागू शकतात. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि वाहतूक खर्चामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी उत्पादनांच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही कंपन्यांनी विविध उत्पादनांच्या किमतीत आधीच वाढ केली असून, आगामी काळात काही उपकरणे ३ ते ८ टक्क्यांपर्यंत महागण्याची शक्यता आहे. विशेषतः एअर कंडिशनरच्या किमतीत तुलनेने मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तर रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि स्मार्ट एलईडी टीव्हीच्या किमतीतही वाढ होऊ शकते.

कच्च्या मालाच्या दरवाढीचा परिणाम

इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या तांबे, ॲल्युमिनियम, स्टील, प्लास्टिक तसेच कच्च्या तेलाशी संबंधित घटकांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे.

तांब्याच्या दरात झालेली वाढ एसी उत्पादकांसाठी विशेष महत्त्वाची ठरत आहे. एका एसीमध्ये साधारणपणे ३ ते ४ किलो तांबे वापरले जाते. त्यामुळे तांब्याच्या वाढलेल्या दराचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर होत आहे. याशिवाय रुपयाच्या विनिमय दरातील चढ-उतार आणि वाढलेला मालवाहतूक खर्च यामुळेही कंपन्यांवरील खर्चाचा दबाव वाढला आहे.

एसीच्या किमतीत सर्वाधिक वाढीची शक्यता

उद्योग क्षेत्रातील माहितीनुसार, एसीच्या किमतीत साधारण ५ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तर काही कंपन्यांकडून वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि एलईडी टीव्हीच्या किमतीत ३ ते ४ टक्क्यांपर्यंत वाढ केली जात आहे. ब्लू स्टार, गोदरेज अप्लायन्सेस, हायर, डायकिन आणि सुपर प्लास्ट्रॉनिक्स यांसारख्या कंपन्यांनी काही उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. तसेच एलजी आणि हिताची ब्रँडचे एसी विकणाऱ्या बॉश होम कम्फर्टनेही एसीच्या दरात सुमारे पाच टक्के वाढ केली आहे.

ग्राहकांच्या बजेटवर परिणाम होणार?

सणासुदीच्या काळात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीत मोठी वाढ होते. त्यामुळे दरवाढीचा परिणाम ग्राहकांच्या बजेटवर होण्याची शक्यता आहे. मात्र, काही विक्रेते आणि वितरकांकडे जुन्या दरातील मालसाठा उपलब्ध असल्याने ग्राहकांना काही ठिकाणी जुन्या किमतीत वस्तू मिळू शकतात.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दुष्काळ पाहणीला आरोपी कसा पोहोचला? रोहिणी खडसेंचा मंत्री गुलाबराव पाटलांना सवाल

Next Post

अजिंठा फाट्यावर एसटी बसची ट्रेलरला जोरदार धडक; २५ प्रवासी जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अजिंठा फाट्यावर एसटी बसची ट्रेलरला जोरदार धडक; २५ प्रवासी जखमी

अजिंठा फाट्यावर एसटी बसची ट्रेलरला जोरदार धडक; २५ प्रवासी जखमी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

राज्यात परतीचा पाऊस, जळगावात मात्र उन्हाचा तडाखा; पुढील ४-५ दिवस हवामान कसं राहणार?

September 28, 2026
खांबावर चढला अन् अचानक वीजप्रवाह सुरू झाला; जळगावात कंत्राटी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

खांबावर चढला अन् अचानक वीजप्रवाह सुरू झाला; जळगावात कंत्राटी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

September 28, 2026
जळगावात मंदिराची दानपेटी लांबवणाऱ्या चोरट्यासह बालक ताब्यात ; साडेबारा हजाराची रोकड जप्त

जळगावात मंदिराची दानपेटी लांबवणाऱ्या चोरट्यासह बालक ताब्यात ; साडेबारा हजाराची रोकड जप्त

September 28, 2026
१०वी, १२ वी, ग्रॅज्युएट/ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; जळगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव जिल्ह्यात २९ सप्टेंबरला रोजगार मेळावा ; १,२५० पेक्षा अधिक रिक्तपदे उपलब्ध

September 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page