राज्यातील हवामानात सध्या कमालीचे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. एकीकडे विदर्भात तापमानाने ४६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडून उष्णतेचा उच्चांक गाठला आहे, तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने (IMD) पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करत नागरिकांना दिलासादायक बातमी दिली आहे.
भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, बुलढाणा, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोदिंया या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. पावसाचा येलो अलर्ट जारी केला. ज्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. मात्र, काही भागात अजूनही उष्णता कायम असेल.
जळगावमध्ये देखील उष्णतेचा कहर कायम आहे. सलग काही दिवसांपासून तापमान 40 अंशांच्या पुढे जात असल्याने शहर अक्षरशः तापले आहे.दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडलेले दिसत असून अत्यावश्यक कामांशिवाय नागरिक बाहेर पडणे टाळत आहेत. उष्ण वाऱ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.














Discussion about this post