Thursday, October 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार ‘स्पिक मॅके शरद अधिवेशन’; १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान सांस्कृतिक मेजवानी!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 1, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावात रंगणार ‘स्पिक मॅके शरद अधिवेशन’; १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान सांस्कृतिक मेजवानी!
बातमी शेअर करा..!

देशभरातील नामवंत शास्त्रीय संगीत, नृत्य व लोककलावंतांच्या सादरीकरणाची रसिकांना पर्वणी

जळगाव : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्र, जळगाव आणि स्पिक मॅके यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पिक मॅके शरद अधिवेशन-२०२६’चे आयोजन १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान जळगाव येथे करण्यात आले आहे. भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, लोककला आणि सांस्कृतिक परंपरांचा परिचय नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या चारदिवसीय सांस्कृतिक महोत्सवात देशातील विविध नामवंत कलाकार आपली कला सादर करणार आहेत. त्यामुळे जळगावातील कलारसिकांसाठी हा महोत्सव विशेष आकर्षणाचा ठरणार आहे.

या अधिवेशनाचे उद्घाटन गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता महाकवी कालिदास सभागृह, मनभावन संकुल, एम. जे. महाविद्यालय परिसर, जळगाव येथे होणार आहे. जिल्हाधिकारी रोहनजी घुगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून आमदार सुरेश भोळे (राजूमामा) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्पिक मॅकेचे संस्थापक प्रा. किरण सेठ, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

उस्ताद शाहिद परवेझ खान यांच्या सितारवादनाने प्रारंभ

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत पद्मश्री उस्ताद शाहिद परवेझ खान यांचे सितारवादन होणार आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामधील सितारवादनाची समृद्ध परंपरा आणि त्यातील बारकावे रसिकांना त्यांच्या सादरीकरणातून अनुभवता येणार आहेत.

गांधी चित्रपटाच्या निर्मितीवर संवाद; शास्त्रीय गायन व कूडियाट्टमची मेजवानी

२ ऑक्टोबर रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत महात्मा गांधी यांच्या चित्रपटाच्या निर्मितीविषयी तज्ज्ञांशी संवाद आयोजित करण्यात आला आहे.

यानंतर सायंकाळी ६.१५ ते ७.४५ वाजेपर्यंत संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त विदुषी कल्पिनी कोमकली यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.४५ ते रात्री ९.१५ वाजेपर्यंत वायएसएनए पुरस्कारप्राप्त विदुषी कपिला वेणू यांचे कूडियाट्टम नृत्य सादरीकरण होणार आहे. केरळच्या पारंपरिक नृत्यपरंपरेतील कूडियाट्टमचा अनुभव जळगावकर रसिकांना या कार्यक्रमातून घेता येणार आहे.

३ ऑक्टोबरला सुंद्री वादन, कर्नाटक व्हायोलिन, कबीर गायन व हिंदुस्थानी गायन

शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी दिवसभर विविध कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. दुपारी २ ते ३.१५ वाजेपर्यंत पं. भीमण्णा जाधव यांचे सुंद्री वादन होईल. त्यानंतर दुपारी ३.१५ ते ४.३० वाजेपर्यंत पद्मश्री शं. कालूराम बामनिया यांचे कबीर गायन होणार आहे.

सायंकाळच्या सत्रात संगीता कलानिधी ललगुडी विजयालक्ष्मी यांचे कर्नाटक पद्धतीचे व्हायोलिन वादन सायंकाळी ६.१५ ते ७.४५ या वेळेत होईल. त्यानंतर सायंकाळी ७.४५ ते रात्री ९.१५ वाजेपर्यंत उस्ताद राजा मियाँ यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायन होणार आहे.

या विविध कार्यक्रमांमधून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताबरोबरच कर्नाटक संगीत, लोकपरंपरा, संत कबीर यांच्या विचारांची गायनपरंपरा आणि भारतीय पारंपरिक नृत्यकलेचा समृद्ध अनुभव रसिकांना मिळणार आहे.

४ ऑक्टोबरला समारोप

चार दिवस चालणाऱ्या या सांस्कृतिक अधिवेशनाचा समारोप रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता महाकवी कालिदास सभागृह, एम. जे. महाविद्यालय परिसर, जळगाव येथे होणार आहे. स्वामी त्यागराजानंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापन मंडळ सदस्य भालचंद्र पाटील आणि संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

या संपूर्ण उपक्रमासाठी कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संचालिका प्रा. मृणालिनी फडणवीस आणि के.सी.ई. सोसायटी स्वागत समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्यासह व्यवस्थापन मंडळ सदस्य आणि के.सी.ई. सोसायटी परिवाराचे सहकार्य लाभत आहे.

भारतीय शास्त्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात देशातील मान्यवर कलाकार सहभागी होत असल्याने जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्राला मोठी पर्वणी मिळणार आहे. विद्यार्थी, कलावंत, संगीतप्रेमी आणि जळगावातील सर्व रसिकांनी या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतीय कलापरंपरेचा अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सर्वोच्च न्यायालयात पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी; २५० जागांवर भरती

Next Post

महायुतीचा विधान परिषदेसाठी फॉर्म्युला ठरला? कुणाला कोणती जागा मिळणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महायुतीचा विधान परिषदेसाठी फॉर्म्युला ठरला? कुणाला कोणती जागा मिळणार?

महायुतीचा विधान परिषदेसाठी फॉर्म्युला ठरला? कुणाला कोणती जागा मिळणार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन्…; हिमाचलमधील खूनातील चौघे संशयित अटकेत!

मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन्…; हिमाचलमधील खूनातील चौघे संशयित अटकेत!

October 1, 2026
अभिजीत दीपकेंची मुंबईत जेल भरो आंदोलन करण्याची घोषणा

मुंबईपासून दिल्लीपर्यंत..; अभिजीत दीपकेंची मुंबईतून मोठी घोषणा

October 1, 2026
जळगावात रंगणार किशोरदांच्या गीतांची अविस्मरणीय मैफल ; ३ ऑक्टोबरला ‘गुड-ए-किशोर’चे आयोजन

जळगावात रंगणार किशोरदांच्या गीतांची अविस्मरणीय मैफल ; ३ ऑक्टोबरला ‘गुड-ए-किशोर’चे आयोजन

October 1, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

राज्यात दुष्काळानंतर आता ‘ऑक्टोबर हिट’चा धोका; जळगावसह अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा वाढला

October 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page