भारतीय स्टेट बँकेत (SBI) नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. बँकेने ट्रेड फायनान्स ऑफिसर (JMGS-I) पदाच्या एकूण ३५ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत आता २८ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

या भरतीमध्ये ट्रेड फायनान्स ऑफिसर पदाच्या दोन श्रेणींसाठी अनुक्रमे १४ आणि २१ जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

शैक्षणिक पात्रता
उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. तसेच IIBF कडील फॉरेक्स ऑपरेशन्समधील प्रमाणपत्र आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा
३१ जुलै २०२६ रोजी उमेदवाराचे वय पदानुसार निश्चित करण्यात आले आहे. पद क्र. १ साठी वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे, तर पद क्र. २ साठी २३ ते ३२ वर्षे आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना ५ वर्षे, तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षांची वयोमर्यादा सवलत लागू आहे.
अर्ज शुल्क किती?
सामान्य, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ७५० रुपये आहे. तर SC, ST आणि PwBD प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
संपूर्ण भारतात नोकरीची संधी
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नियुक्ती मिळू शकते. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून, इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
महत्त्वाची तारीख : ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ सप्टेंबर २०२६ आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सर्व अटी व नियम काळजीपूर्वक तपासावेत.














Discussion about this post