Thursday, September 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

गणरायाच्या स्वागताला पावसाची हजेरी?; जळगावसह राज्यात दमदार सरींचा अंदाज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 10, 2026
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज
बातमी शेअर करा..!

जळगाव : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाच्या पुनरागमनाची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने अनेक भागांत तापमानाचा पारा वाढला असून, नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक हवामान तयार होत असून, १३ सप्टेंबरपासून जळगाव जिल्ह्यात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने खरीप पिकांबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सकाळपासूनच जाणवणारा उकाडा आणि दुपारच्या वेळी वाढणारा उन्हाचा चटका यामुळे वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. त्यामुळे आता पावसाच्या पुनरागमनाकडे शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत स्थानिक वातावरणाच्या प्रभावामुळे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. नंदूरबार, नाशिकचा घाटमाथा आणि नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

राज्यातील पावसाच्या स्थितीत ११ सप्टेंबरपासून बदल होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे सध्या वाढलेला उकाडा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

राज्यातील बहुतांश भागांत सध्या ढगाळ वातावरण आणि उन्हाचा लपंडाव सुरू राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी तुरळक हलक्या सरी पडू शकतात. मात्र, अनेक भागांत पावसापेक्षा उघडीपच अधिक राहण्याची शक्यता आहे.

१३ ते १५ सप्टेंबरदरम्यान जळगावला दिलासा?

जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने १३ ते १५ सप्टेंबर हा कालावधी महत्त्वाचा ठरणार आहे. या काळात जिल्ह्यात काही भागांत दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली असून, या कालावधीत अपेक्षित पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पावसाच्या पुनरागमनाची शक्यता निर्माण झाल्याने ‘गणरायाच्या स्वागताला पाऊस हजेरी लावणार का?’ याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पाचोऱ्यात मुंढेंच्या ‘एफडीए’ची मोठी कारवाई; ७८.६३ लाखांचा रेशनवरील तांदूळ ताब्यात

Next Post

ठाकरेसेनेकडून ४० लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर ; जळगाव मात्र यादीबाहेर!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिवसेना ठाकरे गटाकडून 15 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; जळगाव जिल्ह्यातून यांना संधी..

ठाकरेसेनेकडून ४० लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर ; जळगाव मात्र यादीबाहेर!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भाऊबीजेला साडी-चोळी घेऊन येतो, पण आता.. ; अमृता फडणवीसांच्या निमंत्रणावर जरांगेंचं उत्तर

भाऊबीजेला साडी-चोळी घेऊन येतो, पण आता.. ; अमृता फडणवीसांच्या निमंत्रणावर जरांगेंचं उत्तर

September 10, 2026
१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाचा तब्बल ११,१२७ जागांवर मेगाभरती

दहावी-ITI पास उमेदवारांसाठी खुशखबर! रेल्वेत ४,४७१ पदांची भरती, विनापरीक्षा होणार थेट निवड

September 10, 2026
प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे पुणे- दानापूर दरम्यान दररोज विशेष ट्रेन धावणार

पुणे विभागातील कामामुळे जळगाव-भुसावळ मार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले

September 10, 2026
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

गॅस सिलिंडर बुकिंगचा नियम बदलला; आता दुसरा सिलिंडर कधी बुक करता येणार?

September 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page