Thursday, September 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पाचोऱ्यात मुंढेंच्या ‘एफडीए’ची मोठी कारवाई; ७८.६३ लाखांचा रेशनवरील तांदूळ ताब्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 10, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
पाचोऱ्यात मुंढेंच्या ‘एफडीए’ची मोठी कारवाई; ७८.६३ लाखांचा रेशनवरील  तांदूळ ताब्यात
बातमी शेअर करा..!

पाचोरा : अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पाचोरा तालुक्यातील भोकरी, वरखेडी-पिंपळगाव रोड, भवरखेड येथील मे. श्री महासर माता राईस मिलवर दि. ७ ते ९ सप्टेंबरदरम्यान अचानक तपासणी करण्यात आली. या कारवाईत महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधित असल्याचा संशय असलेला फोर्टीफाइड तांदूळ आढळून आल्याने तब्बल २ लाख ९६ हजार ४७६ किलो तांदूळ, किंमत ७८ लाख ६३ हजार १५० रुपये, असा साठा संशयावरून जप्त करण्यात आला.

तपासणीदरम्यान आस्थापनेतून अन्नाचे सहा नमुने घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये ६४ हजार ५४६ किलो फोर्टीफाइड राईस, १ लाख ३७ हजार ९९६ किलो ब्रोकन राईस, १ हजार ९९६ किलो प्लेन राईस (डोमेस्टिक पर्पज) विनालेबल, ३ हजार ४४६ किलो ब्रोकन राईस (डोमेस्टिक पर्पज) मिसब्रँडेड, तसेच ८१ हजार ४९६ किलो राईस (Gustolo’s) एक्सपोर्ट आणि ६ हजार ९९६ किलो राईस (५% ब्रोकन) मलेशिया एक्सपोर्ट यांचा समावेश आहे.

संबंधित आस्थापना केंद्रीय अन्न परवानाधारक असल्याने या प्रकरणाची माहिती केंद्रीय अन्न परवाना प्राधिकरणास देण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेला फोर्टीफाइड तांदूळ महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधित आहे किंवा नाही, याबाबत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून पुढील तपासणी सुरू आहे.

दरम्यान, तपासणीमध्ये राईस मिलमध्ये उंदराची विष्ठा, धूळ, कोळ्यांची जाळी आढळून आली. तसेच तांदूळ जमिनीवर साठवून ठेवणे, तांदळाच्या पोत्यांवर उत्पादकाचा पत्ता नमूद नसणे आणि खरेदीची बिले सादर न करणे आदी गंभीर त्रुटीही निदर्शनास आल्या. या अनुषंगाने अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, सह आयुक्त (अन्न), ठाणे विभाग एस. एस. जाधव आणि सह आयुक्त (अन्न), नाशिक विभाग मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जळगाव कार्यालयाचे सहायक आयुक्त (अन्न) दीनानाथ शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी शरद म. पवार, आकाश कै. बोऱ्हाडे, किशोर आ. साळुंखे आणि योगराज कि. सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.

जिल्ह्यात अथवा परिसरात अन्न भेसळीचा प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर अथवा तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी; ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा…

Next Post

गणरायाच्या स्वागताला पावसाची हजेरी?; जळगावसह राज्यात दमदार सरींचा अंदाज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

गणरायाच्या स्वागताला पावसाची हजेरी?; जळगावसह राज्यात दमदार सरींचा अंदाज

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाचा तब्बल ११,१२७ जागांवर मेगाभरती

दहावी-ITI पास उमेदवारांसाठी खुशखबर! रेल्वेत ४,४७१ पदांची भरती, विनापरीक्षा होणार थेट निवड

September 10, 2026
प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे पुणे- दानापूर दरम्यान दररोज विशेष ट्रेन धावणार

पुणे विभागातील कामामुळे जळगाव-भुसावळ मार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले

September 10, 2026
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

गॅस सिलिंडर बुकिंगचा नियम बदलला; आता दुसरा सिलिंडर कधी बुक करता येणार?

September 10, 2026
शिवसेना ठाकरे गटाकडून 15 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; जळगाव जिल्ह्यातून यांना संधी..

ठाकरेसेनेकडून ४० लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर ; जळगाव मात्र यादीबाहेर!

September 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page