मुंबई । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आगामी २०२९ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. राज्यातील ४८ पैकी ४० लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर करण्यात आली आहे.मात्र, ठाकरे गटाने जाहीर केलेल्या या यादीत जळगाव लोकसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आलेला नाही. राज्यातील बहुतांश मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नियुक्ती झालेली असताना जळगाव मतदारसंघाबाबत मात्र पक्षाने अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.
या यादीत पक्षाच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे, वरुण सरदेसाई यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, पक्षाने या जबाबदाऱ्यांमध्ये तरुण नेत्यांनाही मोठी संधी दिली आहे.
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह ठाणे आणि जळगाव लोकसभा मतदारसंघ वगळता राज्यातील इतर मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गटाच्या संघटनात्मक हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख
कल्याण आणि भिवंडी – वरुण सरदेसाई
शिर्डी – अहिल्यानगर – सुनील शिंदे
सातारा आणि सांगली – नितीन बानुगडे-पाटील
छत्रपती संभाजीनगर – आशीष चेंबुरकर
शिरूर लोकसभा – किरण तावडे
पुणे जिल्हा – सचिन पडवळ
सोलापूर आणि माढा – सुषमा अंधारे
नाशिक आणि दिंडोरी – रविंद्र मिर्लेकर
बुलढाणा – नितीन देशमुख / नरेंद्र खेडेकर
अकोला – नितीन देशमुख / नीलेश घुमाळ
अमरावती – नितीन देशमुख / डॉ. किशोर ठाकरे
हिंगोली – बबनराव थोरात
कोल्हापूर – अरुण दुधवडकर
बारामती – संजय सावंत
धुळे – अशोक धात्रक
रावेर – गुलाबराव वाघ
नंदुरबार – मुकेश साळुंके
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – प्रदीप बोरिकर
रायगड – संजय मानाजी कदम – (पेण विधानसभा वगळून)
मावळ – प्रसाद भोईर (पेण विधानसभा सहित)
पालघर – विलास पोतनीस
सातारा – उदय ढळवी
सांगली – स्वप्नील कुंजीर
हातकणंगले – महेंद्र इंदुलकर
जालना – सुनील वामन पाटील
धाराशिव – सुनील काटमोरे
नांदेड – किशोर पोतदार
परभणी – प्रदीपकुमार खोपडे
लातूर – परमेश्वर सातपुते
बीड – अशोक सकपाळ
यवतमाळ-वाशिम – दिलीप जाधव
वर्धा – सुधीर सूर्यवंशी
नागपूर – सतीश हर्डे
रामटेक – सुरेश सावंत
गडचिरोली-चिमूर – महेश केदारी
चंद्रपूर – प्रशांत कदम
भंडारा-गोंदिया – राजू पाटील















Discussion about this post