Wednesday, August 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रात आर्टिफिशियल पनीरवर एक वर्षांची बंदी; विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 5, 2026
in महाराष्ट्र
0
702 अन्न नमुन्यांच्या तपासणीत पनीरबाबत धक्कादायक खुलासा ; काय आहे वाचा
बातमी शेअर करा..!

मुंबई । महाराष्ट्रात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एनालॉग चीज अर्थात आर्टिफिशियल पनीरच्या विक्री आणि वापरावर राज्यभर एक वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भातील राजपत्र अधिसूचना जारी केली असून, आता बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

भेसळयुक्त अन्नपदार्थांवर प्रभावी कारवाई सुरू केल्यानंतर एफडीएने हा आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅटरिंग सेवा तसेच आर्टिफिशियल पनीरची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे. भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात आर्टिफिशियल पनीरचा मुद्दा उपस्थित केला होता. राज्यातील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅटरिंग सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर एनालॉग पनीर वापरले जात असल्याचा दावा त्यांनी केला होता. राज्यात विकल्या जाणाऱ्या पनीरपैकी सुमारे 70 टक्के पनीर हे कृत्रिम असल्याचा आरोप करत त्यांनी त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

यानंतर एफडीएने मेनू कार्डवर ‘एनालॉग पनीर’ असा स्पष्ट उल्लेख करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अनेक ठिकाणी या आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता थेट बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एफडीएच्या निर्णयाचे स्वागत करत आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी हा ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय असल्याचे सांगितले. सभागृहात उपस्थित केलेल्या मागणीची दखल घेत राज्य सरकार आणि एफडीएने कठोर पाऊल उचलल्याबद्दल त्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आभार मानले.

एनालॉग पनीर म्हणजे काय?

एनालॉग पनीर म्हणजे दुधापासून तयार न करता रासायनिक प्रक्रिया आणि स्वस्त घटकांचा वापर करून बनविलेले कृत्रिम पनीर होय. हे पनीर तयार करण्यासाठी पाम तेल, स्टार्च, वनस्पतीजन्य फॅट्स, स्किम्ड मिल्क पावडर आणि विविध रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे त्याची किंमत मूळ पनीरपेक्षा कमी असते आणि अनेक व्यावसायिक त्याचा वापर करतात.

आरोग्यासाठी का धोकादायक?

तज्ज्ञांच्या मते, आर्टिफिशियल पनीरमध्ये नैसर्गिक दुधातील पोषक घटक नसतात. त्याऐवजी वापरण्यात येणारे कृत्रिम फॅट्स आणि रसायने दीर्घकाळ सेवन केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.

आता बंदी लागू झाल्यानंतर आर्टिफिशियल पनीरची विक्री, साठवण किंवा वापर आढळल्यास संबंधित व्यापारी, हॉटेल किंवा आस्थापनाविरोधात अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

गृहकर्जांच्या हप्त्यांमध्ये कोणताही दिलासा नाही; आरबीआयकडून व्याजदर जैसे थेच

Next Post

भारतीय टपाल विभागात दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी! ६३,२०० पगार मिळेल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारतीय टपाल विभागात दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी! ६३,२०० पगार मिळेल

भारतीय टपाल विभागात दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी! ६३,२०० पगार मिळेल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हायकोर्टाचा महायुती सरकारला मोठा धक्का; काय आहे वाचा..

‘मुलं ही पालकांची मालमत्ता नाही’; प्रौढ मुलीच्या स्वातंत्र्यावर हायकोर्टाचा मोठा निकाल

August 12, 2026
गुप्त बातमी अन् पोलिसांचा अचानक छापा! जळगावात गावठी पिस्तूल अन् २ जिवंत काडतुसांसह एकाला अटक

गुप्त बातमी अन् पोलिसांचा अचानक छापा! जळगावात गावठी पिस्तूल अन् २ जिवंत काडतुसांसह एकाला अटक

August 12, 2026
घाटकोपरमध्ये मध्यरात्री दरड कोसळून मोठी दुर्घटना; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

घाटकोपरमध्ये मध्यरात्री दरड कोसळून मोठी दुर्घटना; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

August 12, 2026
चाळीसगाव हादरले ! वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पत्नी व अल्पवयीन मुलाकडून पतीची हत्या

चाळीसगाव हादरले ! वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पत्नी व अल्पवयीन मुलाकडून पतीची हत्या

August 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page