Sunday, August 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात दुचाकीच्या लुटीनंतर महामार्गावर ट्रक चालकाला लुटले, ३ जण जेरबंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 21, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगावात दुचाकीच्या लुटीनंतर महामार्गावर ट्रक चालकाला लुटले, ३ जण जेरबंद
बातमी शेअर करा..!

जळगाव : जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अवघ्या ११ दिवसांपूर्वी दुचाकीस्वाराला अडवून लुटल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी मध्यरात्री महामार्गावर ट्रक चालकावर जीवघेणा हल्ला करून रोख रक्कम आणि ऑनलाईन पैशांची लूट केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, जळगाव तालुका पोलिसांनी अवघ्या १२ तासांत धडक कारवाई करत या प्रकरणातील तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून एका अल्पवयीन विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना येथील ट्रक चालक मुकेश रामराव राठोड (वय ३०) हे २० जून रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास त्यांचा ट्रक (एमएच-२१ बीएच-३५३६) घेऊन पाळधी परिसरातून जात होते. त्यावेळी चारचाकी आणि दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी महामार्गावर ट्रकसमोर कार आडवी लावून त्यांचा मार्ग अडवला.

मुख्य आरोपी साहिल शेख उर्फ काल्या आणि त्याच्या साथीदारांनी सुरुवातीला ट्रकवर दगडफेक केली. त्यानंतर चालक मुकेश राठोड आणि त्यांच्या क्लीनरला खाली ओढून बेदम मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांपैकी एका आरोपीने चालकाच्या उजव्या हातावर चाकूने सलग तीन वार करत त्यांना गंभीर जखमी केले.

रोकड कमी वाटल्याने ‘डिजिटल दरोडा’

आरोपींनी जखमी चालकाच्या खिशातील ५ हजार ५०० रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली. मात्र, एवढ्यावर न थांबता त्यांनी चालकाचा मोबाईल ताब्यात घेऊन ‘फोन पे’ अॅपच्या माध्यमातून ९८४ रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी चालकावर सध्या जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), १२६(२), ११५(२), ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१२ तासांत आरोपींचा शोध

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी गुन्हे शोध (डीबी) पथकाला तपासासाठी रवाना केले. गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या १२ तासांत तीन आरोपींना अटक केली, तर एका अल्पवयीन विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये साहिल शेख जब्बार शेख उर्फ काल्या (रा. पाळधी, ता. धरणगाव), विशाल चुडामण पाटील (रा. बिबानगर, जळगाव) आणि मोहित हेमंत गुजर (रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) यांचा समावेश आहे.

आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे

मुख्य आरोपी साहिल शेख उर्फ काल्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात एसटी बस चालकाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच आरोपी विशाल पाटील याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील तसेच डीबी पथकातील प्रदीप राजपूत, योगेश पाटील, अविनाश देवरे, कैलास इंगळे, पंकज देशमुख, प्रशांत ठाकूर, मिलिंद सपकाळे आणि गणेश पाटील यांनी पार पाडली. 

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव पोलिसांनी पकडली गुजरातमधून चोरी गेलेली ९ लाखांची कार

Next Post

नियमबाह्य वसुली भोवणार! जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १० कोटींच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी सुरू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नियमबाह्य वसुली भोवणार! जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १० कोटींच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी सुरू

नियमबाह्य वसुली भोवणार! जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १० कोटींच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी सुरू

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावातील महफिल रेस्टॉरंटला भीषण आग; फर्निचर, एसीसह साहित्य जळून खाक

जळगावातील महफिल रेस्टॉरंटला भीषण आग; फर्निचर, एसीसह साहित्य जळून खाक

August 22, 2026
४ वर्षांखालील मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर मोठा निर्णय; केंद्र सरकारकडून कडक निर्बंध

४ वर्षांखालील मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर मोठा निर्णय; केंद्र सरकारकडून कडक निर्बंध

August 22, 2026
FD करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBIचे नवे नियम १ ऑक्टोबरपासून लागू; फायदा की तोटा होणार?

FD करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBIचे नवे नियम १ ऑक्टोबरपासून लागू; फायदा की तोटा होणार?

August 22, 2026
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?

राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावरून पुण्यात राजकारण तापले; काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

August 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page