ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. ७५ वर्षीय नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे गोव्यात निधन झाले. गोव्यातील डोना पाउला येथील निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे त्यांना वाचवण्यासाठी CPR केले, मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही. पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले.

नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांसह संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या दमदार अभिनयासोबतच साधेपणा, परखडपणा आणि मनमोकळ्या स्वभावामुळे ते सर्वसामान्यांनाही आपलेसे वाटत होते.

दरम्यान, त्यांच्या निधनानंतर गोव्यातील एका कार्यक्रमातील नाना पाटेकरांचा शेवटचा भाषणाचा VIDEO सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर दिवंगत गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याबद्दल बोलताना दिसत आहेत.
‘जायचं तर आहेच…’
या भाषणात नाना पाटेकर यांनी मनोहर पर्रिकर यांच्यासोबतच्या मैत्रीच्या आठवणी सांगताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले होते. पर्रिकर यांच्यासारखे मोठेपण आणि ध्यास प्रत्येकामध्ये असायला हवा, असे ते म्हणाले होते.
याच भाषणात त्यांनी आयुष्याच्या क्षणभंगुरतेबद्दलही भाष्य केले होते. ‘जायचं तर आहेच… मीही उद्या आहे की नाही माहिती नाही… प्रत्येकाला जायचंच आहे… तो काळ येणारच आहे… पण त्याच्या अगोदर मला जे करायचं आहे ते मी करू शकतो का? मी प्रयत्न केले का?’ अशा आशयाचे नाना पाटेकरांचे शब्द आता त्यांच्या निधनानंतर पुन्हा चर्चेत आले आहेत.
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर हा VIDEO सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, त्यांच्या त्या शब्दांकडे आता वेगळ्या भावनेने पाहिले जात आहे.
नाना पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप निर्माण केली. ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’ यांसह अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक प्रभावी आणि बहुआयामी कलाकार गमावला आहे.















Discussion about this post