Saturday, August 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी ! जळगाव-भुसावळ मार्गे धावणाऱ्या दोन गाड्यांच्या कालावधीत वाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 7, 2026
in जळगाव जिल्हा
0
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश
बातमी शेअर करा..!

जळगाव । सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. वाढती गर्दी आणि आरक्षणाचा ताण लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने भुसावळ-दादर साप्ताहिक विशेष रेल्वे तसेच साईनगर शिर्डी-बिकानेर विशेष रेल्वेच्या परिचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई, उत्तर महाराष्ट्र आणि राजस्थानकडे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 09050 भुसावळ-दादर साप्ताहिक विशेष रेल्वे आणि गाडी क्रमांक 09049 दादर-भुसावळ साप्ताहिक विशेष रेल्वे यांचा परिचालन कालावधी 25 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढविण्यात आला आहे. यापूर्वी या गाड्या 31 जुलैपर्यंत चालविण्याचे नियोजन होते. मात्र प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि मोठी मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही दिशांनी मिळून एकूण 16 अतिरिक्त फेऱ्या उपलब्ध होणार आहेत.

मुंबईकडे नोकरी, व्यवसाय, शिक्षण तसेच शासकीय कामांसाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय विशेष लाभदायक ठरणार आहे. सणासुदीच्या काळात आरक्षणासाठी होणारी स्पर्धा कमी होऊन प्रवाशांना अधिक सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, राजस्थानकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही पश्चिम रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे. साईनगर शिर्डी–बिकानेर विशेष रेल्वे 9 आणि 16 ऑगस्ट रोजी धावणार असून, बिकानेर–साईनगर शिर्डी विशेष रेल्वे 8 आणि 15 ऑगस्ट रोजी चालविण्यात येणार आहे. या मार्गावर प्रवाशांसाठी एकूण चार अतिरिक्त विशेष फेऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये किंवा डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्व गाड्या पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच धावतील. या अतिरिक्त फेऱ्यांसाठी आरक्षणाची सुविधा संगणकीकृत रेल्वे आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळेत आरक्षण करून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.विशेष गाड्यांच्या परिचालन कालावधीत वाढ झाल्याने नियमित गाड्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार असून, सणासुदीच्या काळात हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात विजय चौधरी अटकेत; नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई

Next Post

नाशिक इतकं सुंदर केलं होतं तर…; राज ठाकरेंना मंत्री गिरीश महाजन यांचे प्रत्युत्तर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नाशिक इतकं सुंदर केलं होतं तर…; राज ठाकरेंना मंत्री गिरीश महाजन यांचे प्रत्युत्तर

नाशिक इतकं सुंदर केलं होतं तर...; राज ठाकरेंना मंत्री गिरीश महाजन यांचे प्रत्युत्तर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
इराणसोबत युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांची खळबळजनक घोषणा; आता ‘या’ देशावर करणार थेट हल्ला

मैत्रीच्या आडून डोनाल्ड ट्रम्पचा भारताला मोठा धक्का; अमेरिकी सिनेटमध्ये भारत विरोधी बिल पास

August 8, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

शेतकरी कर्जमुक्ती योजना : जळगाव जिल्ह्यात 31,908 पात्र शेतकऱ्यांसाठी 184.16 कोटी रुपये वितरित

August 8, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये परीक्षा न देता थेट नोकरीची संधी, असा करा अर्ज

बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी; 206 पदांसाठी भरती सुरु

August 7, 2026
शेतकऱ्यांच्या हक्कांशी कोणतीही तडजोड होणार नाही’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या हक्कांशी कोणतीही तडजोड होणार नाही’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page