भुसावळ । गणेशोत्सव आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि सोय लक्षात घेऊन साईनगर शिर्डी-बीकानेर, उधना-मधुबनी उधना-झंझारपुर या साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

साईनगर शिर्डी विशेष (०४७१६) ही गाडी आता ४ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर २०२६ -बीकानेर पर्यंत धावेल. बीकानेर साईनगर शिर्डी विशेष (०४७१५) परतीच्या प्रवासातील ही गाडी ३ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सेवा देईल. उधना झंझारपूर विशेष (०९०४७ /०९०४८) उधनावरून सुटणारी गाडी १३ ऐवजी २७ सप्टेंबरपर्यंत, तर झंझारपूरवरून सुटणारी गाडी १४ ऐवजी २८ सप्टेंबरपर्यंत धावेल. उधना मधुबनी विशेष (०९०४५ / ०९०४६) उधनावरून सुटणारी गाडी १३ ऐवजी २७सप्टेंबरपर्यंत आणि मधुबनीवरून सुटणारी गाडी १४ ऐवजी २८ –सप्टेंबरपर्यंत सुरू राहील.

प्रवाशांसाठी आवाहन
सणासुदीच्या काळात गाड्यांमध्ये होणारी गर्दी आणि वेटिंग लिस्टची समस्या टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या वाढीव फेऱ्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी, अशी विनंती रेल्वे विभातर्फे करण्यात आली आहे.















Discussion about this post