मुंबई । महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४२ अंशाच्या वर गेल्याने प्रचंड उन्हाच्या झळा बसत आहे. हवामान खात्यानं 13 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार आवश्यक दक्षता घेण्याबाबत आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
राज्यातील लोकांनी दुपारी 12 ते 4 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, उन्हात वाहने शक्यतो चालवू नये, ज्वलनशील पदार्थापासून शक्यतो दूर राहावे, लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना गेट बंद असलेल्या वाहनात तसेच पार्क केलेल्या वाहनात ठेवू नयेत. तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे, अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा, पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी देण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे
काय करावे
सकाळी ६ ते ११ आणि संध्याकाळी ४ ते ८ या थंड वेळेतच बाहेरील काम करावे
दुपारच्या तीव्र उष्णतेच्या वेळेत अनिवार्य विश्रांती घ्यावी
भरपूर पाणी पिणे आणि शरीर हायड्रेट ठेवणे
ORS आणि इलेक्ट्रोलाइट्सचा वापर करावा
डोक्यावर टोपी/गमछा/स्कार्फ वापरावा
हलके, सैल आणि फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत
शक्य असल्यास सावलीत किंवा थंड ठिकाणी विश्रांती घ्यावी
प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या पाणी केंद्रांचा वापर करावा
उष्माघाताची लक्षणे (डोके गरगरणे, उलटी, अशक्तपणा) दिसल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी
कामगारांनी एकमेकांची आरोग्याची काळजी घ्यावी
काय करू नये
दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात काम करू नये
तहान लागेपर्यंत पाणी न पिणे टाळावे
जास्त वेळ सरळ उन्हात उभे राहणे/काम करणे टाळावे
जड, घट्ट किंवा गडद रंगाचे कपडे घालू नयेत
कॅफिन, मद्य किंवा साखरयुक्त पेये जास्त प्रमाणात घेऊ नयेत
शरीरात थकवा जाणवत असतानाही जबरदस्ती काम करू नये
उष्णतेची लक्षणे दुर्लक्षित करू नयेत
लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना उन्हात सोडू नये
रिकाम्या पोटी किंवा अपुरे पाणी घेऊन काम सुरू करू नये















Discussion about this post