Tuesday, September 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या भूमिकेने खळबळ; सरकारची वाढली धाकधूक!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 27, 2026
in राष्ट्रीय
0
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या भूमिकेने खळबळ; सरकारची वाढली धाकधूक!
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)ने पुन्हा एकदा केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत आंदोलनकर्त्यांविरोधातील कथित कारवाईचा मुद्दा उपस्थित केला आहे. सीजेपीचे म्हणणे आहे की, आंदोलन स्थगित करण्यापूर्वी सरकारने आंदोलकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता विविध राज्यांमध्ये आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

सीजेपीच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर सरकारशी झालेल्या चर्चेनंतर पक्षाने आपले देशव्यापी आंदोलन स्थगित केले होते. त्या वेळी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आल्याचा दावा सीजेपीने केला आहे.

‘आंदोलनकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे’

सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत सरकारवर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारसह विविध राज्यांत आंदोलनात सहभागी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेणे, अटक करणे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या घटना समोर येत आहेत. या घडामोडी अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दास यांनी सांगितले की, सीजेपीची कायदेशीर टीम संबंधित राज्यांतील वकिलांशी समन्वय साधत असून ताब्यात घेतलेल्या किंवा अटक करण्यात आलेल्या विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांची सुटका करून घेण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना आवाहन

आपल्या पोस्टमध्ये सौरव दास यांनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांना सरकारने दिलेले आश्वासन तातडीने पाळण्याचे आवाहन केले आहे. देशभरातील ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्यांची त्वरित सुटका करावी आणि कोणत्याही आंदोलनकर्त्याविरुद्ध सूडबुद्धीने किंवा दबाव टाकण्याच्या हेतूने कारवाई होणार नाही, याची खात्री करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, सीजेपीच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. सरकार यावर काय भूमिका घेते आणि कथित गुन्ह्यांबाबत पुढे कोणता निर्णय घेतला जातो, याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

UPSC कडून ८२८ प्रिन्सिपल व व्हाइस-प्रिन्सिपल पदांची भरती; १४ ऑगस्टपर्यंत अर्जाची संधी

Next Post

चिंचोली उपकेंद्रात ५ एमव्हीए अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
चिंचोली उपकेंद्रात ५ एमव्हीए अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

चिंचोली उपकेंद्रात ५ एमव्हीए अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

८०० रुपयांसाठी आत्तेभावाने संपवले मामेभावाला; भडगावातील खळबळजनक घटना

September 22, 2026
भुसावळ एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग; अडीच ते तीन कोटींचे नुकसान

भुसावळ एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग; अडीच ते तीन कोटींचे नुकसान

September 22, 2026
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

MPSCचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पुन्हा येणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं ; म्हणाले…

September 22, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा! पुढील ४ दिवस कुठे-कुठे यलो अलर्ट?

September 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page