Thursday, August 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एक दिवस आमदार, तरी आयुष्यभर पेन्शन? आमदारांच्या पेन्शनबाबत नागपूर कोर्टात मोठा दावा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
एक दिवस आमदार, तरी आयुष्यभर पेन्शन? आमदारांच्या पेन्शनबाबत नागपूर कोर्टात मोठा दावा
बातमी शेअर करा..!

नागपूर । विधानसभा किंवा विधान परिषदेचे फक्त एक दिवस सदस्य राहिल्यानंतरही आयुष्यभर दरमहा ५० हजार रुपये पेन्शन मिळण्याच्या तरतुदीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. माजी आमदारांना कोणतीही किमान सेवा अट नसताना पेन्शन देण्याची तरतूद घटनाबाह्य असून, ती समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करणारी असल्याचा दावा जनहित याचिकेत करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य पेन्शन अधिनियम १९७६ मधील कलम ३(१) वर याचिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर किमान किती कालावधी सेवा करावी, याची कोणतीही अट नसताना पेन्शन देणे तर्कसंगत नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

फक्त एक दिवस आमदार राहिलेल्या व्यक्तीला आणि पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या आमदाराला सुरुवातीला समान पेन्शन मिळणे योग्य नाही, असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे पेन्शनसाठी किमान वाजवी सेवा कालावधी निश्चित करून सेवाकाळाच्या प्रमाणात पेन्शन ठरवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्याच्या नियमानुसार सुरुवातीला दरमहा ५० हजार रुपये पेन्शन मिळते. पाच वर्षांपेक्षा अधिक सेवा केल्यास प्रत्येक अतिरिक्त पूर्ण वर्षासाठी दरमहा २ हजार रुपये अतिरिक्त पेन्शनची तरतूद आहे.

पेन्शनवर सरकारचा कोट्यवधींचा खर्च

याचिकेत दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ६३० माजी विधानसभा सदस्यांना दरमहा ३ कोटी ६९ लाख ९० हजार रुपये, तर १४४ माजी विधान परिषद सदस्यांना ८३ लाख २३ हजार रुपये पेन्शन दिली जाते. याशिवाय ५९६ लाभार्थ्यांना कुटुंब निवृत्तीवेतनापोटी दरमहा २ कोटी ३८ लाख ४० हजार रुपये दिले जातात. माजी आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पेन्शनवर राज्य सरकारचा वार्षिक खर्च तब्बल ८२ कोटी ९८ लाख ३६ हजार रुपये होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ सप्टेंबर रोजी ठेवली आहे. त्यामुळे माजी आमदारांच्या पेन्शनची विद्यमान व्यवस्था कायम राहणार की त्यात बदल होणार, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या पुढील सुनावणीत काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

वरणगावमध्ये १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वर्षभर अत्याचार; ४ जणांना अटक, एका अल्पवयीन मुलावर कारवाई

Next Post

कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डरचे प्रकरण: काँग्रेसचा मंत्री गिरीश महाजनांवर हल्लाबोल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डरचे प्रकरण: काँग्रेसचा मंत्री गिरीश महाजनांवर हल्लाबोल

कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डरचे प्रकरण: काँग्रेसचा मंत्री गिरीश महाजनांवर हल्लाबोल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ३/२५’ !  ७ गावठी कट्टे, ११ जिवंत राऊंडसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ३/२५’ ! ७ गावठी कट्टे, ११ जिवंत राऊंडसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

August 13, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

‘भोळा राहिलो तर भाजपवाले खातील’ ! जळगावात व्यासपीठावर मंत्री गुलाबराव पाटलांची राजकीय फटकेबाजी

August 13, 2026
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला; आरोपी ताब्यात

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला; आरोपी ताब्यात

August 13, 2026
युवकांनो रील बनवा अन् जिंका २५ हजार रुपये; माती-पाणी संवर्धनावर राज्यस्तरीय स्पर्धा

युवकांनो रील बनवा अन् जिंका २५ हजार रुपये; माती-पाणी संवर्धनावर राज्यस्तरीय स्पर्धा

August 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page