Thursday, October 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला; आरोपी ताब्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला; आरोपी ताब्यात
बातमी शेअर करा..!

नांदेड : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नांदेडच्या माता साहिब कौर गुरुद्वारा परिसरात दर्शनासाठी आले असताना एका व्यक्तीने सुरक्षा व्यवस्था भेदून त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोराला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, सुखबीरसिंग बादल हे वैयक्तिक भेटीसाठी नांदेड येथील गुरुद्वारात आले होते. त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली होती. दर्शन घेऊन बाहेर पडत असताना अचानक एका निहंग व्यक्तीने त्यांच्यावर कृपाणने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत बादल यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणात पोलिसांनी ६२ वर्षीय जसपालसिंग याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. तो पुणे येथील रहिवासी असून पुणे न्यायालयात वकिली करत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो नांदेडच्या मुगट येथील माता साहिब गुरुद्वारात सेवा देत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू असून हल्ल्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास केला जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांकडून माहिती

सुखबीरसिंग बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी नांदेडचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. आरोपीला तत्काळ ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली असून, हल्ल्यामागील उद्देशाचा सखोल तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुखबीरसिंग बादल यांच्या पत्नी आणि खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत सुखबीर बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या घटनेनंतर गुरुद्वारा परिसरातील सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक करण्यात आली आहे.

सुखबीर बादल यांच्यावर यापूर्वीही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. ४ डिसेंबर २०२४ रोजी अमृतसरच्या सुवर्ण मंदिराबाहेर त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळीही सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला होता. आता नांदेडमध्ये पुन्हा त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

युवकांनो रील बनवा अन् जिंका २५ हजार रुपये; माती-पाणी संवर्धनावर राज्यस्तरीय स्पर्धा

Next Post

‘भोळा राहिलो तर भाजपवाले खातील’ ! जळगावात व्यासपीठावर मंत्री गुलाबराव पाटलांची राजकीय फटकेबाजी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

‘भोळा राहिलो तर भाजपवाले खातील’ ! जळगावात व्यासपीठावर मंत्री गुलाबराव पाटलांची राजकीय फटकेबाजी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्य महत्वाचे : प्रमोद राणेराजपूत

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्य महत्वाचे : प्रमोद राणेराजपूत

October 8, 2026
‘२०१८ची शिवसेना पक्षाची घटना असंवैधानिक असेल तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?’; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात सवाल

ठाकरेंच्या अडचणी वाढणार? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाने पुन्हा उपस्थित केला ‘पक्षघटने’चा मुद्दा

October 8, 2026
अपघाताने फुटले गुटखा तस्करांचे बिंग! अपघातग्रस्त कारमधून लाखोंचा गुटखा जप्त

अपघाताने फुटले गुटखा तस्करांचे बिंग! अपघातग्रस्त कारमधून लाखोंचा गुटखा जप्त

October 8, 2026
खरगेंची ‘लंच डिप्लोमसी’; राहुल-प्रियंकांसह विरोधी खासदार राजघाटकडे रवाना

खरगेंची ‘लंच डिप्लोमसी’; राहुल-प्रियंकांसह विरोधी खासदार राजघाटकडे रवाना

October 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page