Thursday, August 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

युवकांनो रील बनवा अन् जिंका २५ हजार रुपये; माती-पाणी संवर्धनावर राज्यस्तरीय स्पर्धा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 13, 2026
in जळगाव जिल्हा
0
युवकांनो रील बनवा अन् जिंका २५ हजार रुपये; माती-पाणी संवर्धनावर राज्यस्तरीय स्पर्धा
बातमी शेअर करा..!

जळगाव । मृद व जलसंधारण सप्ताहानिमित्त युवकांच्या कल्पकतेतून माती व पाणी संवर्धनाचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी राज्यस्तरीय ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्व्हेशन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमारो’ ही या स्पर्धेची संकल्पना आहे. युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अ.मं. पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या स्पर्धेत १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक सहभागी होऊ शकतात. रीलचा कालावधी ३० ते ६० सेकंद असावा. रील स्वतःच्या पब्लिक इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करावी, #SaveSoilSaveWater हा अधिकृत हॅशटॅग वापरणे तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग करणे बंधनकारक आहे. प्रत्येक स्पर्धकाला जास्तीत जास्त ३ रील्स अपलोड करता येतील. रील अपलोड करण्याचा कालावधी १५ ते १९ ऑगस्ट असा आहे. रीलच्या सुरुवातीला रीलचा उद्देश, स्पर्धकाचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.

स्पर्धेसाठी माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना तसेच ‘आजचे संवर्धन – उद्याचे सुरक्षित भविष्य’ या विषयांवर रील तयार करता येणार आहे.

स्टोरीटेलिंग, ॲक्टिंग, म्युझिक, डान्स, ॲनिमेशन, एआय क्रिएटिव्ह, कॉमेडी, शॉर्ट फिल्म, बिफोर–आफ्टर आणि ड्रोन व्हिज्युअल्स अशा नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करता येणार आहे.

रीलचे परीक्षण एकूण १०० गुणांवर केले जाणार आहे. त्यामध्ये विषय व संदेशासाठी ३० गुण, कल्पकतेसाठी २५ गुण, प्रभावी सामाजिक संदेशासाठी २० गुण, सादरीकरण व टेक्निकल क्वालिटीसाठी १५ गुण आणि इन्स्टाग्राम एंगेजमेंटसाठी १० गुण देण्यात येतील.

जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार २५ हजार रुपये, द्वितीय पुरस्कार १५ हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार १० हजार रुपये असे आकर्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत. विजेत्यांना ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ म्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल. उत्कृष्ट सहभागींना ई-सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.

माती व पाणी संवर्धनाचा संदेश युवकांच्या सर्जनशील माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सणासुदीत सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार? अंडी-चिकनपासून लसूण-कांद्यापर्यंत सगळं महागलं

Next Post

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला; आरोपी ताब्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला; आरोपी ताब्यात

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला; आरोपी ताब्यात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ३/२५’ !  ७ गावठी कट्टे, ११ जिवंत राऊंडसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ३/२५’ ! ७ गावठी कट्टे, ११ जिवंत राऊंडसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

August 13, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

‘भोळा राहिलो तर भाजपवाले खातील’ ! जळगावात व्यासपीठावर मंत्री गुलाबराव पाटलांची राजकीय फटकेबाजी

August 13, 2026
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला; आरोपी ताब्यात

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला; आरोपी ताब्यात

August 13, 2026
युवकांनो रील बनवा अन् जिंका २५ हजार रुपये; माती-पाणी संवर्धनावर राज्यस्तरीय स्पर्धा

युवकांनो रील बनवा अन् जिंका २५ हजार रुपये; माती-पाणी संवर्धनावर राज्यस्तरीय स्पर्धा

August 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page