पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये अत्यंत मोठी राजकीय उलथापालथ झाली असून राज्याचे सत्ताकारण पूर्णपणे बदलले आहे. सुरुवातीच्या काही तासांत तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाल्यानंतर आता निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट होत असून बंगालमध्ये सत्तांतर निश्चित मानले जात आहे.
ताज्या कलांनुसार भारतीय जनता पक्ष (BJP) ने जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडा सहज पार केला आहे. भाजप सध्या १८७ जागांवर आघाडीवर असल्याचे समोर आले आहे, जे राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवणारे ठरत आहे.
दुसरीकडे, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) ला या निवडणुकीत मोठा फटका बसताना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये १५ वर्षानंतर सत्तांतर होत असल्याचे चिन्ह आहे. तृणमूलसाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात असून, पक्षाची सत्ता गमावण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार तृणमूलला केवळ ९८ जागांवर आघाडी घेता आलीय
राज्यातील मतदारांनी दिलेल्या कौलामुळे बंगालच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे स्पष्ट झाली असून, येत्या काळात राज्याच्या सत्ताकारणात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.















Discussion about this post