Tuesday, June 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

सावकारी परवाना मंजुरीसाठी ३० हजारांची लाच; भुसावळच्या सहकार अधिकाऱ्यासह तिघांवर एसीबीची कारवाई

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 16, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
लाचलुचपत प्रतिबंधक विभागात ‘दक्षता जनजागृती सप्ताह २०२५’ उत्साहात सुरू
बातमी शेअर करा..!

भुसावळ । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून अशातच भुसावळमधून लाचखोरीच्या मोठी बातमी समोर आलीय. सावकारी परवाना मंजूर करून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी जळगाव एसीबीने भुसावळच्या सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी आणि दोन प्रमाणित लेखापरीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केले. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वर्ग-३ चा सहकार अधिकारी विजय विनायकराव गरूड (वर्ग-३, सहकार अधिकारी, रा. धुळे) हा एसीबीचा सुगावा लागताच पसार झाला आहे. तर सुरेश जनार्दन विसपुते (प्रमाणित लेखापरीक्षक, रा. भुसावळ) आणि हेमंत प्रकाश काळे (प्रमाणित लेखापरीक्षक, रा. जळगाव) या दोघांना अटक केली  आहे.  या कारवाईमुळे सहकार विभागात एकच खळबळ उडाली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भुसावळ येथील रहिवासी असून त्यांना सावकारी व्यवसायासाठी परवाना घ्यावयाचा होता. त्यासाठी त्यांनी ३० मार्च २०२६ रोजी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, भुसावळ येथे अर्ज दाखल केला होता. परवाना मंजूर करून देण्यासाठी सहकार अधिकारी विजय गरूड यांनी २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून त्यांनी तक्रारदारास प्रमाणित लेखापरीक्षक सुरेश विसपुते यांना भेटण्यास सांगितले होते.

याबाबत तक्रारदाराने २३ एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने लाचमागणी पडताळणी कारवाई केली असता, सुरेश विसपुते यांनी तक्रारदाराकडे सहकार अधिकारी गरूड, स्वतः आणि दुसरे प्रमाणित लेखापरीक्षक हेमंत काळे यांच्यासाठी मिळून एकूण ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार सोमवारी (१५ जून) एसीबीने सापळा रचला. भुसावळ शहरातील नाहाटा चौफुली परिसरात सुरेश विसपुते यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ३० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याआधी त्यांनी हेमंत काळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तक्रारदाराशी बोलणे करून दिले. तसेच लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे तपासात समोर आले आहे. याशिवाय स्वीकारलेल्या लाच रकमेपैकी ५ हजार रुपये सहकार अधिकारी विजय गरूड यांच्या सांगण्यावरून त्यांना फोन-पेच्या माध्यमातून पाठविण्यात आल्याची बाबही उघडकीस आली आहे. मात्र, याच दरम्यान कारवाईची कुणकुण लागल्याने सहकार अधिकारी विजय गरुड हा घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी ठरला.

या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल आला असून दोन जणांना अटक करण्यात आलीय. तर फरार अधिकारी विजय गरुड याचा पोलीस शोध घेत आहेत.

ही सापळा कारवाई हेमंत खंडू नागरे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोलीस हवालदार किशोर महाजन, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर व बाळू मराठे यांचा सहभाग होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रिमता नवघरे करीत आहेत. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक भारत तांगडे तसेच अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धक्कादायक ! जयपूरमध्ये कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दीपकेंना मारहाण; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Next Post

टायर फुटताच धावत्या ट्रकने घेतला पेट; चालक-क्लीनरच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
टायर फुटताच धावत्या ट्रकने घेतला पेट; चालक-क्लीनरच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली

टायर फुटताच धावत्या ट्रकने घेतला पेट; चालक-क्लीनरच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अमळनेर रेल्वे स्टेशन हादरले: आरपीएफ कार्यालयात सहाय्यक फौजदाराने झाडली स्वतःवर गोळी; प्रकृती गंभीर

अमळनेर रेल्वे स्टेशन हादरले: आरपीएफ कार्यालयात सहाय्यक फौजदाराने झाडली स्वतःवर गोळी; प्रकृती गंभीर

June 16, 2026
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर

जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल; १२ अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या

June 16, 2026
“रणरणत्या उन्हात मान्सूनची आनंदाची बातमी! यंदा मान्सून वेळेआधी धडकणार

महाराष्ट्रात मान्सून रखडला, ‘एल निनो’मुळे पाऊस गायब; स्कायनेटचा चिंता वाढवणारा नवा अंदाज!

June 16, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्वाचे निर्णय; या जिल्ह्यांना सर्वाधिक फायदा

June 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page