जळगाव | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यातील १२ शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत तांत्रिक अडचणींमुळे निर्धारित मुदतीत अर्ज करता न आलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, प्रवेश अर्ज करण्यासाठी १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पात्र विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाच्या https:hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट संबंधित वसतिगृहात सादर करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग तसेच अनाथ प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना आरक्षणानुसार शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करून त्याची प्रत संबंधित वसतिगृहात जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहाचे गृहपाल अथवा ‘सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, जळगाव’ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.














Discussion about this post