Wednesday, October 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पुण्यातील MPSC आंदोलनावरून पेटले राजकारण; रोहिणी खडसे आणि चित्र वाघ यांच्यात शाब्दिक युद्ध

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 7, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
..तर वरिष्ठ नेत्यांना विचारा अन् मगच बोला ; रोहिणी खडसे चित्रा वाघांवर बरसल्या
बातमी शेअर करा..!

पुणे । पुण्यात MPSC परीक्षांमधील कथित घोटाळे, पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील दिरंगाईच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले. या मुद्द्यावरून आता राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय कलारंग पाहायला मिळत असून, रोहिणी खडसे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे.

रोहिणी खडसेंचा सरकारवर गंभीर आरोप
पुण्यातील आंदोलनस्थळी पोहोचलेल्या रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. परीक्षांमधील गैरप्रकार आणि सततच्या पेपरफुटीमुळे लाखो तरुण विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे सांगत त्यांनी सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी आग्रही मागणी केली.

यावेळी बोलताना खडसे यांनी सरकारमधील महिला नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला. “काळ्याकुट्ट नकली भुवया घेऊन.. अगं बाई तू ये” अशा शब्दांत त्यांनी टीका केली. तसेच, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ‘नौटंकी’ म्हणणाऱ्यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी येऊन विद्यार्थ्यांची व्यथा समजून घ्यावी, असा चिमटाही त्यांनी काढला. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील पालक आपल्या मुलांना अधिकारी बनवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतात, याची जाणीव नेत्यांना असली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

चित्रा वाघ यांचे रोहिणी खडसेंना प्रत्युत्तर
रोहिणी खडसेंच्या या आक्रमक टीकेला चित्रा वाघ यांनीही तितक्याच आक्रमकपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.चित्रा वाघ यांनी म्हटले की, “माझ्यावर चिखलफेक करण्याआधी ‘तुतारी’च्या ‘पिपाणी’ने स्वतःच्या गिरेबानात डोकावून पहावं. तुमची नीतीमत्ता काय? खरं तर कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर मला बोलायला आवडत नाही. पण जेव्हा रोहिणी खडसेंसारखे लोक जास्त शहाणपणा करतात आणि राजकीय टीकेच्या सर्व पातळ्या ओलांडतात, तेव्हा त्यांना अशी आठवण करून द्यावीच लागते.”

तसेच, MPSC च्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना विषय काय आहे आणि आपण काय बोलतोय, याचे किमान भान तरी ठेवायला हवे, असे सुनावत केवळ टाळ्या मिळवण्यासाठी दुसऱ्या महिलेवर वैयक्तिक टीका करणे योग्य नाही, असा सवालही वाघ यांनी उपस्थित केला. या राजकीय कलह आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता पूर्णपणे राजकीय वळण लागल्याचे दिसून येत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याला पुन्हा तेजी; आज मोठी वाढ, जळगावात १० ग्रॅमचा भाव काय?

Next Post

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या वसतिगृह प्रवेशासाठी १० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
..तर वरिष्ठ नेत्यांना विचारा अन् मगच बोला ; रोहिणी खडसे चित्रा वाघांवर बरसल्या

पुण्यातील MPSC आंदोलनावरून पेटले राजकारण; रोहिणी खडसे आणि चित्र वाघ यांच्यात शाब्दिक युद्ध

October 7, 2026
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याला पुन्हा तेजी; आज मोठी वाढ, जळगावात १० ग्रॅमचा भाव काय?

October 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page