Tuesday, June 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

साहेब, निर्णय घ्या..! राज्यसभा तिकीट नाकारल्याने भुजबळ समर्थकांचा एल्गार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 9, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
… अन्यथा वॉरंट काढले जाईल ; न्यायालयाने मंत्री भुजबळांना दिली तंबी, काय आहेत प्रकरण?
बातमी शेअर करा..!

नाशिक । राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हायव्होल्टेज ड्राम्याचा अखेर अत्यंत धक्कादायक शेवट झाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची वर्णी लागणार अशी दाट शक्यता असताना, ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला आहे. पक्षनेतृत्वाने भंडारा-गोंदिया मतदारसंघातील माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाच्या या अनपेक्षित निर्णयामुळे छगन भुजबळ अत्यंत नाराज असून, त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

राज्यसभेचे तिकीट नाकारण्यात आल्यामुळे छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी आता उघडपणे आपली नाराजी आणि विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे. भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकच्या येवला शहरात समर्थकांनी ठिकठिकाणी आक्रमक पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्सवर “साहेब, निर्णय घ्या” असा थेट आणि गर्भित इशारा देण्यात आला आहे. ऐन राजकीय धामधुमीत लागलेल्या या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून भुजबळ आता काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिल्लीतून भुजबळांचा ‘तो’ प्रस्ताव फेटाळला?
मिळालेल्या माहितीनुसार, पक्ष सुरुवातीला छगन भुजबळ यांनाच राज्यसभेत पाठवण्यास अनुकूल होता. मात्र, पक्षांतर्गत बैठकीत भुजबळ यांनी पक्षासमोर एक मोठी अट ठेवली होती. आपले पुतणे समीर भुजबळ यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद दिले, तरच आपण राज्यसभेत जाऊ, असे भुजबळांनी स्पष्ट केले होते.

राष्ट्रवादी नेतृत्वाने हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत दिल्लीपर्यंत पोहोचवला. मात्र, दिल्लीतील हायकमांडने हा प्रस्ताव साफ फेटाळून लावला. “फक्त एका व्यक्तीसाठी मंत्रिमंडळ विस्तार किंवा विशेष शपथविधी करणे शक्य नाही,” असे दिल्लीतून स्पष्ट सांगण्यात आल्यामुळे भुजबळांची कोंडी झाली आणि पर्यायाने पक्षाला राजेंद्र जैन यांच्या नावाचा विचार करावा लागला.

या सर्व नाट्यमय घडामोडींवर आणि नाराजीच्या चर्चांवर स्वतः छगन भुजबळ यांनी जाहीर प्रतिक्रिया दिली आहे. “मला लोकसभा आणि राज्यसभेत जाण्याची इच्छा होती, हे सत्य आहे. यापूर्वीही अनेकदा संधी अगदी जवळ आली, पण शेवटच्या क्षणी ती मिळाली नाही,” असे म्हणत भुजबळांनी आपली खंत बोलून दाखवली. मात्र, भुजबळांनी संयम राखला असला तरी त्यांच्या समर्थकांचा रोष आता नियंत्रणाबाहेर गेला असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह यामुळे चव्हाट्यावर आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘रक्त सांडू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही!’ हजारो शेतकऱ्यांनी फुकले सरकारविरोधात रणशिंग

Next Post

आजच्या कॅबिनेट बैठकीत 4 धडाकेबाज निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

आजच्या कॅबिनेट बैठकीत 4 धडाकेबाज निर्णय

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयुक्त; ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली

जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयुक्त; ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली

June 9, 2026
भुसावळ रेल्वे स्थानकावरील ‘त्या’ व्हिडिओनंतर विक्रेत्याला अटक; स्टॉल केला सील, ठेकेदाराचे धाबे दणाणले!

भुसावळ रेल्वे स्थानकावरील ‘त्या’ व्हिडिओनंतर विक्रेत्याला अटक; स्टॉल केला सील, ठेकेदाराचे धाबे दणाणले!

June 9, 2026
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

June 9, 2026
नाशिकमध्ये महायुतीत ठिणगी! भाजपच्या बंडखोर उमेदवारापुढे मंत्र्यांचे मनधरणीचे प्रयत्न निष्फळ; मंत्री महाजनांवर संशयाची सुई?

नाशिकमध्ये महायुतीत ठिणगी! भाजपच्या बंडखोर उमेदवारापुढे मंत्र्यांचे मनधरणीचे प्रयत्न निष्फळ; मंत्री महाजनांवर संशयाची सुई?

June 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page