जळगाव । सध्या जळगाव जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून रावेर शहरात वाढत्या उष्णतेचा पहिला बळी गेल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उष्मघातामुळे योगेश सुधाकर महाजन (रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, रावेर) या तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश महाजन हे बांधकाम क्षेत्रात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रोजंदारीवर काम करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या योगेश महाजन यांचे जीवन कष्टमय असले तरी कुटुंबासाठी ते सातत्याने झटत होते. बांधकामावरील कामासोबतच फावल्या वेळेत ते दुधाच्या डेअरीमध्येही काम करत होते.
दरम्यान, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानाचा फटका त्यांना बसला आणि उष्णतेच्या तीव्र झळांमुळे त्यांना उष्मघाताचा त्रास झाला. उपचारासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रावेर शहरात शोककळा पसरली असून कुटुंबाचा आधारवड हरपल्याने पत्नी आणि दोन लहान मुलांचे भविष्य चिंतेत आले आहे.















Discussion about this post