जळगाव – महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या वतीने ओंकारनगर, जळगाव येथे “कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्र” खान्देश शाखेचा उद्घाटन समारंभ छोटेखानी कार्यक्रमात पार पडला.
महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ ज्येष्ठ सल्लागार बंडू दादा काळे, महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ अध्यक्ष अरुण दादा बोरोले, महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ खान्देश महिला उपाध्यक्षा नीता वराडे, महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ कोषाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील, जळगाव जिल्हा लेवा पाटीदार मंडळ अध्यक्ष लिलाधर चौधरी, महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ विधी सल्लागार डॉ. ॲड. ज्योती भोळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ अध्यक्ष अरुण दादा बोरोले यांनी केले. समुपदेशन समितीचे कार्य केवळ वैवाहिक संबंधांपुरते मर्यादित नसून शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी तसेच गरीब शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवरही केंद्र काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात उपस्थित समाजबांधवांमधून काही नावे निवडून लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यामधून शांताराम फेगडे यांच्या हस्ते समुपदेशन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ खान्देश महिला उपाध्यक्षा नीता वराडे यांनी समुपदेशनाची आवश्यकता अधोरेखित केली. महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ ज्येष्ठ सल्लागार बंडू दादा काळे यांनी समुपदेशन समितीचे काम काटेकोर व निःपक्षपातीपणे पार पाडण्याची ग्वाही दिली.
जिल्हा परिषद माजी आरोग्य सभापती कमलाकर रोटे यांनी या उपक्रमाचे स्वागत करून सहकार्याची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ विधी सल्लागार डॉ. ॲड. ज्योती भोळे यांनी समाजाच्या सर्वांगीण समस्यांवर काम होण्याची गरज व्यक्त केली. प्रा. संध्या महाजन यांनी लेवा गणबोली ही मातृभाषा असल्याचे सांगत तिच्या जतनाचे आवाहन केले.समारंभाला महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे पदाधिकारी, सभासद तसेच समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ कोषाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ खान्देश उपाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सायोजिका साधना लोखंडे यांनी पसायदान सादर केले.















Discussion about this post