Wednesday, July 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 8, 2026
in जळगाव जिल्हा
0
नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील
बातमी शेअर करा..!

 जागतिक महिला दिनानिमित्त, मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय विभागांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान 

जळगाव  । आई, बहीण, पत्नी आणि मुलगी या चार शब्दांमध्ये स्त्रीचे संपूर्ण विश्व सामावलेले असून या चार नात्यांमुळेच कुटुंब उभे राहते, संस्कार रुजतात आणि समाजाचे भविष्य घडते. महाराष्ट्राची भूमी ही जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांसारख्या कर्तृत्ववान महिलांनी पावन केलेली आहे. या भूमीत स्त्री केवळ कुटुंबाचा आधारस्तंभ नाही, तर समाज परिवर्तनाची एक मोठी शक्ती आहे. आज प्रशासनातील विविध क्षेत्रांमध्ये महिला आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडत असून प्रत्येक ठिकाणी महिलांनी आपल्या कर्तृत्वाने आणि कष्टाने स्वतःची कार्यक्षमता सिद्ध केली आहे. महिला अबला नसून सबला आहे. समाजाचे रक्षण असो किंवा संस्कृतीची जपणूक असो, महिलांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. “नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे” असे ठाम मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा नियोजन समिती कार्यालयात जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय विभागांमध्ये उत्कृष्ट आणि प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या  अधिकारी, कर्मचारी महिलांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत पालकमंत्र्यांनी पुरस्कार प्राप्त सर्व महिलांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महिला व बालविकास अधिकारी आर.आर.तडवी उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहणेही अत्यंत गरजेचे आहे  स्त्री आरोग्यदृष्ट्या सक्षम असेल तर संपूर्ण कुटुंब आणि समाज निरोगी राहतो. महिलांनी आयुष्यातील कितीही अडचणी आल्या तरी आनंदी राहून सकारात्मकतेने जीवन जगले पाहिजे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजना महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री कन्यादान योजना, सुकन्या समृद्धी योजना, लाडकी बहीण योजना तसेच महिला बचत गट अनुदान योजना यांमुळे महिलांना आर्थिक व सामाजिक बळ मिळत आहे. तसेच स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन आणि इतर अनेक विकास योजनांमध्ये महिलांचा मोठा सहभाग असल्याचे त्यांनी नमूद केले.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले, महात्मा जोतिराव  फुले, सावित्रीबाई फुले यांचे कार्य खूप मोठे असून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला त्यामुळे आज स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात संधी मिळाली असून त्यांची विविध क्षेत्रात प्रगती झाली आहे. सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी चांगली कामगिरी केली आहे. शासनाच्या बऱ्याच योजना घरोघरी जाऊन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या  महिलाच करीत आहेत. केंद्र व राज्य शासनाने महिलांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिल्यामुळे आज महिला स्वावलंबी होऊन प्रगती करीत आहेत. असे त्यांनी सांगितले.

खासदार स्मिता वाघ यावेळी म्हणाल्या, महिला आई, बहीण, पत्नी अशा वेगवेगळ्या स्वरूपात आपली भूमिका बजावत असते ही भूमिका बजावताना महिलांनी आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. एक महिला घर सांभाळते, कुटुंबाला सांभाळते नोकरी करते, व्यवसाय बघते सासू-सासर्‍यांची सेवा करते , मुलांकडे, पतीकडे लक्ष देते अशी विविध कामे एक महिला करीत असते त्यामुळे तिला आपण अष्टभुजेचे रूप म्हणतो. असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी रोहन घुगे आपल्या मनोगत म्हणाले, लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या आयुष्यात अमुलाग्र  बदल घडून आला आहे. बचत गटामुळे त्यांची प्रगती होत आहे. महिलांनी विविध क्षेत्रात कार्य करीत असताना आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे असे सांगितले.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यावेळी म्हणाल्या, महिलांनी सर्व जबाबदारी सांभाळत सर्व क्षेत्रात काम करत असताना  परंतु याबरोबरच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊन स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. कार्यक्रमाला विविध शासकीय कार्यालयातील महिला अधिकारी कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नागरिकांनो काळजी घ्या ! महाराष्ट्रात उष्णेतेच्या लाटेचा इशारा; आज कुठे कसं हवामान?

Next Post

ओम बिर्लांविरोधात आज अविश्वास प्रस्ताव, लोकसभा अध्यक्षांना हटवण्यासाठी किती मतांची गरज?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
विरोधकांचा आवाज दाबला जातोय! काँग्रेसचा लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव

ओम बिर्लांविरोधात आज अविश्वास प्रस्ताव, लोकसभा अध्यक्षांना हटवण्यासाठी किती मतांची गरज?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
ब्रिटिश संसदीय लोकशाहीचा प्रत्यक्ष अभ्यासासाठी प्रा. डॉ. सुनील नेवे यांची ‘हाऊस ऑफ कॉमन्स व हाऊस ऑफ लॉर्ड्स’ला भेट

ब्रिटिश संसदीय लोकशाहीचा प्रत्यक्ष अभ्यासासाठी प्रा. डॉ. सुनील नेवे यांची ‘हाऊस ऑफ कॉमन्स व हाऊस ऑफ लॉर्ड्स’ला भेट

July 1, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; आजपासून नवे दर लागू

July 1, 2026
धरणगावातील घरफोडीचा गुन्हा उघड; दोन आरोपी जेरबंद, एक विधिसंघर्षग्रस्त बालकही ताब्यात

धरणगावातील घरफोडीचा गुन्हा उघड; दोन आरोपी जेरबंद, एक विधिसंघर्षग्रस्त बालकही ताब्यात

July 1, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

July 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page