नाशिक शहरात आज म्हणजेच २१ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबरपर्यंत मनाई आदेश लागू आहेत. आजपासून १५ दिवस ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. पोलिसांकडून मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत
शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी प्रशासनाने २१ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार मनाई आदेश लागू केले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींमुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्याचप्रमाणे सण उत्सवामध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी १५ दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू केले असल्याचं समोर आलंय.
मनाई आदेश देण्यामागे काय कारण?
२१ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबरपर्यंत दरम्यान स्फोटक पदार्थ, शस्त्र बाळगण्यास, शस्त्र जमा करण्यास अथवा विक्री करण्यास मनाई आहे. मनाई कालावधीत प्रतीकात्मक चित्रं, पुतळ्याचे दहन, घोषणा देणं , आक्षेपार्ह वक्तव्य करण्यास देखील सक्त मनाई आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक आहे. विना परवानगी मोर्चे, आंदोलनांना मनाई देखील या १५ दिवसांमध्ये करण्यात आलीय.















Discussion about this post