मुंबई । राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आली आहे. जुलै महिना सुरू झाला असला तरी राज्यातील अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात अद्याप जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे आता जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार का? याबाबत महिलांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विविध माध्यमांतील माहितीनुसार, दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ३,००० रुपये महिलांच्या खात्यात एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, जून महिन्याचा हप्ता अनेकांच्या खात्यात न आल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून रखडलेले हप्ते लवकरच वितरित करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, ई-केवायसी अपूर्ण असणे, आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसणे तसेच पात्रतेच्या निकषांतील त्रुटी यामुळे अनेक महिलांचे हप्ते थांबले आहेत. अशा लाभार्थी महिलांची संख्या सुमारे ८० लाखांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, जून आणि जुलैचे प्रत्येकी १,५०० रुपये मिळून ३,००० रुपये एकत्र जमा होणार का, याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाखो लाभार्थी महिलांचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.















Discussion about this post