Sunday, June 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

अपघाताचा बनाव फसला; दारूच्या नशेत मित्रांनीच केला तरुणाचा गेम! तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 21, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
अपघाताचा बनाव फसला; दारूच्या नशेत मित्रांनीच केला तरुणाचा गेम! तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

यावल । यावल तालुक्यातील कोळन्हावी-डांभुर्णी रस्त्यावरील तरुणाच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडले असून, हा अपघात नसून नियोजित खून असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मित्रांनीच दारूच्या नशेत झालेल्या वादातून 26 वर्षीय तरुणाची हत्या करून अज्ञात वाहनाच्या अपघाताचा बनाव रचल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत तरुणाचे नाव पवन रवींद्र सोळंके (वय 26, रा. कोळन्हावी) असे आहे. घटनेनंतर संशयितांनी पवनचा मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेत झाल्याचे सांगत त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. यासंदर्भात पोलिसांत अपघाताची फिर्यादही देण्यात आली होती. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती आणि जखमांचे स्वरूप संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.

उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन आणि गुन्हे शोध पथकाने सखोल तपास सुरू केला. चौकशीदरम्यान संशयितांच्या जबाबात विसंगती आढळून आली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर संपूर्ण कट उघडकीस आला.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पवन आणि त्याचे मित्र यांनी रात्री शेतात मद्यपानाची पार्टी केली होती. त्यानंतर काही जण घरी परतले; मात्र पवन सोळंके, उमेश परदेशी, चेतन कोळी आणि लोकेश महाजन हे पुढे किनगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये गेले. तेथे मद्यपानादरम्यान झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात तिघांनी पवनला निर्जन ठिकाणी नेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली.

गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह रस्त्यालगत टाकून अपघाताचा बनाव करण्यात आला. मात्र पोलिसांच्या तपासापुढे हा कट टिकू शकला नाही. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.

या प्रकरणी उमेश दिलीप परदेशी (रा. कोळन्हावी), चेतन मोतीराम कोळी आणि लोकेश दिवाकर महाजन (दोघे रा. डांभुर्णी) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यावल पोलिस करीत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नियमबाह्य वसुली भोवणार! जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १० कोटींच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी सुरू

Next Post

भीषण दुर्घटना; सी-फूड कारखान्यात अमोनिया गॅस गळतीमुळे ७ महिला कामगारांचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भीषण दुर्घटना; सी-फूड कारखान्यात अमोनिया गॅस गळतीमुळे ७ महिला कामगारांचा मृत्यू

भीषण दुर्घटना; सी-फूड कारखान्यात अमोनिया गॅस गळतीमुळे ७ महिला कामगारांचा मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भीषण दुर्घटना; सी-फूड कारखान्यात अमोनिया गॅस गळतीमुळे ७ महिला कामगारांचा मृत्यू

भीषण दुर्घटना; सी-फूड कारखान्यात अमोनिया गॅस गळतीमुळे ७ महिला कामगारांचा मृत्यू

June 21, 2026
अपघाताचा बनाव फसला; दारूच्या नशेत मित्रांनीच केला तरुणाचा गेम! तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

अपघाताचा बनाव फसला; दारूच्या नशेत मित्रांनीच केला तरुणाचा गेम! तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

June 21, 2026
नियमबाह्य वसुली भोवणार! जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १० कोटींच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी सुरू

नियमबाह्य वसुली भोवणार! जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १० कोटींच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी सुरू

June 21, 2026
जळगावात दुचाकीच्या लुटीनंतर महामार्गावर ट्रक चालकाला लुटले, ३ जण जेरबंद

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page