मुंबई । मागच्या महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी होत आहे. यातच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीची आज घोषणा होणार असल्याची माहिती समोर आलीय
आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार दुपारी 2 वाजता राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांसोबत संवाद साधणार आहेत.
या दरम्यान, राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रति हेक्टरी किमान दोन ते पाच हजार रुपये अधिक मदत जाहीर करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या आर्थिक पॅकेजवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे महायुती सरकारने सावध पावले उचलली आहेत.
२६ जिल्ह्यांमधील १७८ तालुक्यांमध्ये १२ ते २८ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ७५ लाख शेतकऱ्यांचे सुमारे ६० लाख हेक्टरहून अधिक जमिनींवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. एक लाख ६१ हजाराहून अधिक पशुधन मृत्यूमुखी पडले आहेत. ९ हजार २६३ हेक्टर जमीन खरडून गेल्याने २६ हजार शेतकर्यांना फटका बसला आहे.















Discussion about this post