Friday, July 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

चोपड्यात शस्त्रतस्करीचा डाव उधळला; LCBच्या कारवाईत तिघे जेरबंद, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 3, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
चोपड्यात शस्त्रतस्करीचा डाव उधळला; LCBच्या कारवाईत तिघे जेरबंद, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
बातमी शेअर करा..!

चोपडा | जळगाव जिल्हा पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्रास्त्रांविरोधात मोठी कारवाई करत आंतरजिल्हा शस्त्रतस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि चोपडा शहर पोलिसांनी संयुक्तपणे राबविलेल्या या मोहिमेत गावठी पिस्तूल, दोन मॅगझिन, तीन मोबाईल फोन आणि एक कार असा सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. १ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काही संशयित व्यक्ती Hyundai EON कारमधून गावठी कट्टा घेऊन लासूर–चुंचाळे मार्गे चोपड्याकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि चोपडा शहर पोलिसांनी शनिमंदिर परिसरात सापळा रचला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास संशयित कार अडवून पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान कारच्या मागील सीटखाली एक गावठी पिस्तूल, त्यासोबत मॅगझिन आणि एक अतिरिक्त मॅगझिन सापडले. आरोपींकडून तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले.

या प्रकरणात ज्ञानेश्वर रामकृष्ण माळी (रा. कुन्हाड खुर्द, ता. पाचोरा), सचिन रोशन पवार (रा. मयूर पार्क कॉलनी, गंगापूर) आणि अनिल कचरे साळुंखे (रा. जाधव गल्ली, गंगापूर) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींचे इतर गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहेत का, तसेच ही शस्त्रे कोणाला पुरविण्यात येणार होती, याचा तपास सुरू आहे.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे ६० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल व मॅगझिन, १० हजार रुपयांचे अतिरिक्त मॅगझिन, ५ लाख रुपयांची Hyundai EON कार आणि सुमारे ३० हजार रुपये किमतीचे Oppo, Vivo व Redmi कंपनीचे तीन मोबाईल फोन यांचा समावेश आहे. एकूण जप्तीची किंमत जवळपास ६ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि चोपडा शहर पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, दीपक माळी, रविंद्र पाटील, विष्णू बिन्हाडे, रावसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, युवराज बाकुंज तसेच अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील 63,511 कर्जखात्यांची माहिती शासनच्या पोर्टलवर अपलोड

Next Post

पदवीधरांना बँकिंग क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! IBPS कडून ६,७१५ पीओ पदांसाठी बंपर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
IBPS अंतर्गत ग्रॅज्युएट पाससाठी 8594 पदांवर भरतीची घोषणा

पदवीधरांना बँकिंग क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! IBPS कडून ६,७१५ पीओ पदांसाठी बंपर भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
IBPS अंतर्गत ग्रॅज्युएट पाससाठी 8594 पदांवर भरतीची घोषणा

पदवीधरांना बँकिंग क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! IBPS कडून ६,७१५ पीओ पदांसाठी बंपर भरती

July 3, 2026
चोपड्यात शस्त्रतस्करीचा डाव उधळला; LCBच्या कारवाईत तिघे जेरबंद, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

चोपड्यात शस्त्रतस्करीचा डाव उधळला; LCBच्या कारवाईत तिघे जेरबंद, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 3, 2026
शेतकऱ्यांनो! दुकानात बियाणे खरेदीला जाताना ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा

शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील 63,511 कर्जखात्यांची माहिती शासनच्या पोर्टलवर अपलोड

July 3, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी विविध योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page