नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) प्रिन्सिपल आणि व्हाइस-प्रिन्सिपल पदांच्या एकूण ८२८ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. म्हणजेच अर्ज करण्यासाठी आता अवघे काही तास उरले असून पात्र उमेदवारांनी वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करावा
या भरती प्रक्रियेद्वारे प्रिन्सिपल पदाच्या १२४ आणि व्हाइस-प्रिन्सिपल पदाच्या ७०४ जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
प्रिन्सिपल पदासाठी :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी
बी.एड. (B.Ed.) पात्रता
संबंधित क्षेत्रातील किमान १० वर्षांचा अनुभव
व्हाइस-प्रिन्सिपल पदासाठी :
पदव्युत्तर पदवी
बी.एड. पात्रता
PGT म्हणून दोन वर्षांचा किंवा TGT म्हणून तीन वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा
१४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या स्थितीनुसार:
प्रिन्सिपल: कमाल ५० वर्षे
व्हाइस-प्रिन्सिपल: कमाल ३५ वर्षे
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे. अनुसूचित जाती-जमातींसाठी ५ वर्षे, तर ओबीसी उमेदवारांसाठी ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्ग: ₹२५
एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १७ ऑगस्ट २०२६ (सायं. ६ वाजेपर्यंत)
कंप्युटर आधारित परीक्षा (CRT): १ नोव्हेंबर २०२६
इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता, अनुभव आणि इतर अटींची खात्री करून घेणे आवश्यक आहे.














Discussion about this post