मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या जाहीर केल्या आहेत. ३० एप्रिल २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशानुसार विविध जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षक, उपआयुक्त तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नव्या पदांवर बदली करण्यात आली आहे.
कोणाची कुठे बदली?
जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय के. बन्सल यांची बदली आता राज्य सायबर सुरक्षेच्या अधीक्षकपदी करण्यात आली आहे. तर नाशिक ग्रामीणचे अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि फोर्स वनचे गजानन राजमाने या अनुभवी अधिकाऱ्यांची रवानगी मुंबईच्या पोलीस उपआयुक्तपदी करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीणच्या रिक्त जागेवर आता ठाणे ग्रामीणचे अधीक्षक धोडोंपत एस. स्वामी यांची वर्णी लागली आहे.
अहिल्यानगरचे अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची पोलीस महासंचालक कार्यालयात सहायक पोलीस महानिरीक्षक म्हणून वर्णी लागली असून, त्यांच्या जागी चंद्रपूरचे मुम्मका सुदर्शन पदभार स्वीकारतील. परभणीचे अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी आता मुंबईत राज्य गुप्तवार्ता विभागात उपआयुक्त असतील, तर त्यांच्या जागी पंकज कुमावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यातील अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे प्रमुख निकेश खाटमोडे यांची वाशिमच्या अधीक्षकपदी बदली झाली असून, वाशिमचे अनुज मिलिंद तारे आता खाटमोडे यांच्या जागी पुण्यात टास्क फोर्सची सूत्रे हाती घेतील.















Discussion about this post