Friday, May 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अमळनेरमध्ये खळबळ! ५० हजार रुपयांची लाच घेणारा ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 1, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ
बातमी शेअर करा..!

अमळनेर | पेव्हर ब्लॉक आणि गटारीच्या कामाचे १२ लाख रुपयांचे बिल मंजूर करून दिल्याचा मोबदला म्हणून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नगाव (ता. अमळनेर) येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. अमळनेर शहरातील केलेनगर भागात ३० एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, नगाव बुद्रुक येथे झालेल्या गटारीच्या व पेव्हर ब्लॉकच्या कामाचे १२ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी रवींद्र पवार यांनी ७ टक्के दराने ८४ हजार रुपयांच्या कमिशनची मागणी केली होती. यातील १३०० रुपये पवार यांनी आधीच ‘फोन पे’द्वारे स्वीकारले होते. उर्वरित रकमेसाठी तक्रारदाराने ३० एप्रिल रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती.

स्वतःच्या घरीच स्वीकारली लाच

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीने ढेकू रस्त्यावरील केलेनगर भागात असलेल्या रवींद्र पवार यांच्या घराबाहेर सापळा रचला. तडजोडीअंती ठरलेली ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे अमळनेर महसूल आणि ग्रामपंचायत प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

आजारपणामुळे अटक टळली, पण गुन्हा दाखल

ग्रामविकास अधिकारी रवींद्र पवार यांना किडनीचा गंभीर त्रास असून ते नुकतेच धुळ्याहून डायलिसिस करून परतले होते. त्यांच्या या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना तातडीने अटक करण्यात आली नाही, मात्र कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी हेमंत नागरे, स्मिता नवघरे, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, बाळू मराठे, किशोर महाजन, सुनील वानखेडे, भूषण पाटील, मनोज पाटील, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी आणि सचिन चाटे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राष्ट्रवादीत मोठा भूकंप! ९० हून अधिक पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक राजीनाम्याने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

अमळनेरमध्ये खळबळ! ५० हजार रुपयांची लाच घेणारा ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

May 1, 2026
राष्ट्रवादीला मोठं खिंडार ; अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

राष्ट्रवादीत मोठा भूकंप! ९० हून अधिक पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक राजीनाम्याने खळबळ

May 1, 2026
मुली लय हुशार..! १०वी परीक्षेचा निकाल जाहीर ; यंदाही मुलींनी मारली बाजी

मोठी बातमी! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार; दुपारी १ वाजता पाहता येणार ऑनलाइन रिझल्ट

May 1, 2026
चिंताजनक ! कतारमधील सर्वात मोठ्या एलएनजी सेंटरवर हल्ला, भारतावर काय परिणाम होणार?

महागाईचा ‘मे’ ब्लास्ट! निवडणूक संपताच गॅस सिलिंडरच्या किमतीत विक्रमी वाढ, सर्वसामान्यांना मोठा झटका

May 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page