मुंबई : रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. फडणवीस सरकारने दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर केली असून, रायगडच्या पालकमंत्रिपदी मंत्री भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
यासंदर्भात राज्य सरकारकडून अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे, नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आल्याने उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातही याची चर्चा सुरू झाली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक स्पष्ट दिशा मिळणार असून, पालकमंत्र्यांकडे जिल्ह्यातील विकासकामे आणि विविध प्रशासकीय बाबींच्या समन्वयाची जबाबदारी असणार आहे.















Discussion about this post